ठळक बातम्या.....


प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

सांगलीत एसटीचे 70 कर्मचारी निलंबित


एसटी महामंडळाचे जिल्ह्यातील एसटीचे 70 कर्मचारी निलंबित   करण्यात आले. एसटी कामगारांच्या संपात सहभागी झाल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. एसटीच्या संपात सहभागी तात्पुरत्या वेतनश्रेणीवरील 268 कर्मचार्‍यांची ते कामावर हजर न झाल्यास सेवासमाप्ती केली जाईल, अशा नोटिसा बजावल्या होत्या.त्यानंतर गुरुवारी चौघेजण कामावर हजर झाले. आज शिवशाहीच्या पाच गाड्या सुरू होत्या. मिरज ते कागवाड व जत ते विजापूर मार्गावर एसटी सुरू करण्यात आली.

चांद्रयान-2 चा अपघात सुदैवाने टळला..!

अपघात केवळ रस्त्यावरच होतात असे नाही. आता अंतराळातही एक अपघात होण्याची वेळ आली होती व सुदैवाने ती टळली. भारताचे ‘चांद्रयान-2’ ची ‘नासा’च्या ‘लूनार रिकनायसन्स ऑर्बिटर’शी धडक होण्याचा संभाव्य धोका निर्माण झाला होता. मात्र, त्याची वेळीच कल्पना आल्याने ‘इस्रो’ने ‘चांद्रयान-2’ च्या ध्रुवीय कक्षेत बदल केला आणि ही संभाव्य धडक टळली!

तीन कृषी कायदे मागे घेण्याची मोदींची घोषणा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शुक्रवारी तीन कृषी कायदे मागे घेण्याची मोठी घोषणा केली. पंतप्रधान मोदी यांनी आज सकाळी ९ वाजता देशवासियांना संबोधित केले. यावेळी त्यांनी कृषी कायद्यांबाबत मोठा निर्णय जाहीर केला. शेतकऱ्यांच्या हितासाठी तीन कृषी कायदे आणले होते, असेही त्यांनी यावेळी नमूद केले. गेल्या वर्षी २६ नोव्हेंबर पासून शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन सुरु केले आहे. गेल्या वर्षभरापासून हे आंदोलन कायम आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली.



Post a Comment

Previous Post Next Post