इंदिरा गांधी आणि वल्लभभाई पटेलांना सांगली काँग्रेसचे अभिवादन..!!


प्रेस मीडिया वृत्तसेवा :

सांगली दि. ३१: भारताचे माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या ३७ व्या पुण्यतिथीनिमित्त व माजी गृहमंत्री स्व. वल्लभभाई पटेल यांच्या १४६ व्या जयंतीनिमित्त आज सांगली काँग्रेसच्या वतीने त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 

प्रारंभी काँग्रेस सेवा दल जिल्हा उपाध्यक्ष पैगंबर शेख यांनी स्वागत केले. सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले यांनी प्रास्ताविकात इंदिरा गांधी व वल्लभभाई पटेल यांच्या कार्याचा आढावा घेतला व काँग्रेस पक्षाचे योगदान सांगितले. 

यावेळी महाराष्ट्र प्रदेश शिक्षक काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रा. एन. डी. बिरनाळे यांनी '' स्व. इंदिरा गांधी यांनी देश अखंड ठेवण्यासाठी बलिदान दिले.. कृषी.. विज्ञान तंत्रज्ञान.. महिला उन्नती व शिक्षण.. क्रिडा विकास.. उद्योग व जलसिंचन इ. क्षेत्रात भरीव कामगिरी केली. स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी भरीव कामगिरी केली आहे. रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत व शेवटच्या श्वासापर्यंत देशाची सेवा करीत राहणार असा चंग बांधला व तसे करुन दाखवले. बँकांचे राष्ट्रीयीकरण करुन काॅमन मॅनला पत दिली. गरीबी हटाव व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचे लाभ जनतेला दिले. त्या काँग्रेस पक्षाच्या बेडर नेत्या होत्या. सरदार वल्लभभाई पटेल यांनी स्वातंत्र्य चळवळीत मोठे योगदान दिले आहे. स्वातंत्र्यानंतर संस्थाने विलिनीकरण करणारे ते लोहपुरुष होते. काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी त्यांनी मोठी मेहनत घेतली आहे. हे दोन्ही बलाढ्य व्यक्ती खरे भारतरत्न होत.स्व. वसंतदादा,गुलाबराव, विष्णूअण्णा,डॉ. पतंगराव कदम, प्रकाशबापू, मदनभाऊ यांची काँग्रेस अधिक बळकट करण्यासाठी समाजातील बुध्दिजीवी वर्गाला पक्षप्रवाहात आणून महिला व युवक व युवतींना काँग्रेस व इंदिरा गांधी आणि वल्लभभाई पटेल यांचा त्याग सांगून पक्षाची कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि हेच खरे इंदिरा गांधी व सरदार पटेल यांना अभिवादन ठरेल . '' असे गौरवोद्गार काढले. यावेळी अध्यक्षस्थानावरुन महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा श्रीमती शैलजा भाभी पाटील यांनी काँग्रेस पक्ष संघटन मजबूत करा.. गट तट न मानता काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकीने काम केले पाहिजे. पक्षात राहून पक्ष वाढवा असे आवाहन केले. 

यावेळी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या सरचिटणीस सौ. मालन मोहीते,अशोक वारे, विश्वास यादव, मौला वंटमोरे, अल्लाबक्ष मुल्ला, विठ्ठलराव काळे, बाबगोंडा पाटील, शिवाजीराव सावंत, शैलेंद्र पिराळे, जन्नत नायकवडी, शमशाद नायकवडी इ. मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post