मनपा सभापती सुशिला जगदिश घरत यांनी स्वखर्चाने पीव्हीसी पाईप लाईनचे काम करून दिले.



प्रेस मीडिया वृत्तसेवा :

 रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील :

असोसिएशन मधील रहिवाश्यांना सुरळीत पाणी पुरवठा व्हावा, या साठी महानगरपालिकेच्या प्रभाग 'ड' सभापती सुशिला जगदिश घरत यांनी स्वखर्चाने पीव्हीसी पाईप लाईनचे काम करून दिले. 

         नवीन पनवेल मधील  ई १ ते ५ मधील पाणी पुरवठा पाइपलाईनचे काम भाजपच्या नगरसेविका व प्रभाग समिती सभापती सुशिला घरत यांनी स्वखर्चाने करून दिले. त्यामुळे नागरिकांना आता सुरळीत पाणी पुरवठा होणार आहे. त्यामुळे ई १ ते ५ मधील रहिवाशांनी सभापती सुशिला घरत यांना धन्यवाद देत आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post