ब्रेकींग न्युज : कर्जत तालुक्यातील कळंब येथील बडोदा बँकेच्या शाखेला लागलेल्या आगीत बँक जळून खाक


प्रशासनाच्या लापरवाईपणा मुळे बँकेचे मोठे नुकसान .....





प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

पनवेल सुनील पाटील

                 कर्जत तालुक्यातील कर्जत-मुरबाड राज्यमार्ग रस्त्यावर असलेल्या कळंब गावातील नाक्यावर असलेल्या बडोदा बँकेच्या शाखेला आग लागली.अग्निशमन यंत्रणा घटनास्थळी पोहचायला पावणे आठ च्या सुमारास पोहचली,मात्र त्यामुळे या आगीत संपूर्ण बँक जळून खाक झाली असून शॉटसर्किट मुळे आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

                      कर्जत-मुरबाड राज्यमार्ग रस्त्यावर कळंब हे गाव असून येथे देना बँक ही एकमेव बँक होती.त्या बँकेचे विलनीकरण नुकतेच बडोदा बँकेत झाले असून मुख्य रस्त्याच्या बाजूला या बँकेची शाखा आहे.आज 8 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजून 20 मिनिटांनी बँकेच्या शाखेला आग लागल्याचे स्थानिकांनी पाहिले.आज सायंकाळी साडे पाच वाजता बँकेचे कर्मचारी हे शाखा बंद करून तेथून निघून गेले होते.सर्वप्रथम बँकेचे एटीएम सेन्टरच्या आत मधून धूर येताना दिसला आणि हो हो म्हणता आग पुढे वाढत गेली.त्यात स्थानिकांनी तात्काळ कर्जत येथे कर्जत नगरपरिषदच्या अग्निशमन दलाला कळविले.त्यावेळी पाऊस सुरू असल्याने आग आणखी वाढत होती,तर स्थानिक लोक आग विझविण्याचा प्रयत्न केले.मात्र आग वाढत असल्याने आगीने रौद्ररूप धारण करीत होती.त्यात पोलिसांचा संपर्क आग लागल्यापासून पुढील अर्धा तास नव्हता.त्यामुळे स्थानिकांनी प्रयत्न करून महावितरण कंपनी ला आगीमुळे आणखी शॉर्टसर्किट होऊ नये यासाठी वीज पुरवठा बंद करण्यास सांगितले.त्यावेळी कळंब गावातील बँकेच्या शाखा परिसरातील जवळपास 200 मीटर परिसर स्थानिकांनी मदत करण्यासाठी भरून गेला होता.

                  सहा वाजून चाळीस मिनिटांनी कर्जत येथील अग्निशमन दलाला या आगीबद्दल फोन वरून कळविण्यात आले होते.मात्र अग्निशमन बंद तेथे पोहचायला तब्बल पावणे आठ वाजले.त्यावेळपर्यँत संपूर्ण बँकेची शाखा जळून भस्मसात झाली होती.बडोदा बँकेचे एटीएम सेन्टर तसेच या आगीत बँकेच्या शाखेतील सर्व महत्वाची कागदपत्रे आणि दस्तावेज हे जळून खाक झाले आहेत.त्यामुले किमान 25हजार खातेदार असलेल्या या बँकेच्या खातेदार यांच्यात कमालीची भीती निर्माण झाली आहे.

शहनवाज लोगडे-स्थानिक

आग लागल्यापासून जवळपास सव्वा तासांनी अग्निशमन गाडी कळंब येथे पोहचली.तसे पाहिले तर कर्जत पासून कळंब हे अंतर रस्ता सुस्थितीत असल्याने अर्धा तासात पार करता  येते.तरी देखील प्रशासनाचा बेपर्वाई पणामुळे बँकेचे मोठे नुकसान झाले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post