नियुक्तीपत्र प्रदान सोहळा संपन्न

 लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांनी सर्व नियुक्त पदाधिकार्‍यांना शुभेच्छा दिल्या.



प्रेस मीडिया वृत्तसेवा :

पनवेल :सुनील पाटील :

 भारतीय जनता पार्टी कामोठे शहर मंडळाच्या विविध पदांवर नियुक्त करण्यात आलेल्या पदाधिकार्‍यांचा नियुक्तीपत्र प्रदान सोहळा संपन्न झाला. कामोठे येथील भाजपच्या कार्यालयात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला असून, त्यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकार्‍यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांनी सर्व नियुक्त पदाधिकार्‍यांना शुभेच्छा देत पुढील वाटचाली करीता शुभेच्छा दिल्या.

       भारतीय जनता पार्टीच्या कामोठे शहर उपाध्यक्षपदी राजेश म्हात्रे, शहर चिटणीसपदी  नारायण पोपेटा, कामोठे शहर ओबीसी सेल अध्यक्षपदी भाऊ भगत व ओबीसी सेल उपाध्यक्षपदी स्वप्नील म्हात्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा नियुक्तीपत्र प्रदान सोहळा कामोठे येथील भाजपच्या कार्यालयात संपन्न झाला. या वेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष के.के.म्हात्रे, कामोठे शहर अध्यक्ष रविंद्र जोशी, जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, पनवेल महापालिकेचे नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, गोपीनाथ भगत, दिलीप पाटील, विकास घरत, विजय चिपळेकर, प्रदिप भगत, नगरसेविका पुष्पा कुत्तरवडे, हेमलता गोवारी, ओबीसी सेल उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष राजेश गायकर, युवानेते हॉप्पी सिंग, समाजसेवक आर.जी.म्हात्रे, कामोठे शहर महिला मोर्चा अध्यक्षा वनीता पाटील, महिला भटके विमुक्त आघाडीच्या जिल्हाध्यक्ष विद्या तामखेडे, महिला मोर्चा कामोठे सरचिटणीस मनिषा वनवे, शहर उपाध्यक्ष रमेश तुपे, कामोठे शहर युवामोर्चा अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, रावसाहेब बुधे, नाना मकदुम, उत्तम जाधव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post