विजयादशमी दसरा सीमोल्लंघनाचा कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न



प्रेस मीडिया वृत्तसेवा :

 इचलकरंजी :  शुक्रवार दिनांक 15 ऑक्टोबर 2021. रोजी आपल्या मंदिराच्या ठिकाणी विजयादशमी दसरा सीमोल्लंघनाचा  कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी समाजातील बंधू-भगिनी मान्यवर व परिसरातील सर्व भक्तजन मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 या वेळेस पालखीचे पूजन चिदानंद बिळ्ळूर व मंडळाचे अध्यक्ष श्री देवेंद्र आमटे यांच्या शुभहस्ते करण्यात औंध. पालखी मिरवणूक श्री नंदू हेरलगी व राजू हारुगेरी यांच्या शुभहस्ते झाली. व बाहेर शमी चे (आपट्याच्या पानांचे) पूजन व शस्त्र पूजन परिसरातील प्रतिष्ठित नागरिक ॲड. हिरेमठ यांच्या हस्ते व मंडळाचे अध्यक्ष देवेंद्र आमटे व अखिल भारतीय धनगर समाजाचे अध्यक्ष बाळासाहेब देवनाळ, मंडळाचे सेक्रेटरी इराण्णा मट्टीकल्ली, संचालक राजू चचडी,प्रकाश वरदाई, राजू भावीकट्टी, श्री शंकर बिळ्ळूर, मंडळाचे उपाध्यक्ष शिवकुमार मुरतले व परिसरातील व समाजातील बंधू- भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला या सर्व कार्यक्रमाची पूजा विधि आपल्या मंदिरातील पुजारी व रमेश हिरेमठ यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post