नवरात्री निमित्त विविध स्पर्धा उत्साहात संपन्न.



प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

इचलकरंजी न्यू ॲक्टिव ग्रुप तर्फे  नवरात्री उत्सवानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन घेण्यात आल्या..

*पाककला स्पर्धा*(उपवासाचा गोड / तिखट पदार्थ घरून करून आणणे.) व स्पर्धे दिवशी मांडणी करणे. *टाकाऊ पासून टिकाऊ* घरीच करायचं आहे. फक्त 1 मिनिटांचे व्हिडिओ , फोटो पाठवणे व स्पर्धेदिवशी आणुन मांडणी करणे.*रांगोळी स्पर्धा* ओटीच्या साहित्यापासून रांगोळी तयार करणे. इत्यादी स्पर्धा आज रविवार दिनांक 10 ऑक्टोंबर 2021. रोजी दुपारी बारा वाजता कामगार भवन इचलरकंजी येथे अति उत्साहात पार पडला.

 याप्रसंगी प्रमुख पाहुणे आदर्श पत्रकार महासंघाचे अध्यक्ष व  प्रेस मीडियाचे  संपादक मेहबूब सर्जेखान पुणे व  गीता संघर्ष न्यूज पेपर चे संपादक श्री गणेश पाखरे व या बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष रामचंद्र शिंदे माजी सैनिक व मुक्त सैनिक सोसायटीचे माजी चेअरमन यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. प्रथम या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन करून व विद्येची देवता सरस्वती मातेच्या फोटो पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली पाहुण्यांचा परिचय व पाहुण्यांचं स्वागत श्री मुरतले सर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲक्टिव ग्रुप चे अध्यक्षा सौ.गीता भागवत मॅडम यांनी केले. मनोगतामध्ये स्पर्धका मधुन स्वाती नाडगौडा यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रमुख पाहुणे यांनी आपले मनोगता मनोगतामध्ये नवरात्रीच्या कालावधीमध्ये नऊ दुर्गांचा हा आगळावेगळा कलाविष्कार पहावयास मिळाला याबद्दल त्यांनी खूप आनंद व्यक्त केले. श्री पाखरे सर यांनी ओटीच्या माध्यमातून साकारलेल्या विविध रांगोळ्यांचे कौतुक केले. यामध्ये विविध रुपातीले देवींचे दर्शन त्यांना घडले. यानंतर बक्षीस वितरण कार्यक्रम प्रथम सहभाग झालेल्या सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला यानंतर विविध स्पर्धेमध्ये तृतीय, द्वितीय व प्रथम अशा क्रमाने आलेल्या स्पर्धकांचे बक्षीस वितरण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. 

या मध्ये 24 स्पर्धकांनी भाग घेतला. या कार्यक्रमाचे परीक्षण सौ गीता भागवत, सौ सरिता पांडव, विजया माळी, सौ राखी मुरतले, दीप्ती लोकरे, माधवी करांगळे इत्यादींनी विविध स्पर्धेचे परीक्षण केले. हा कार्यक्रम संपन्न होण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष गीता भागवत, उपाध्यक्ष श्री भिमराव पोवार सर, खजिनदार लक्ष्मण पाटील सर, सहसचिव संजीवनी हरिअर, सचिव विजया माळी, सरीता पांडव, राखी मुरतले, अनिता माने, अमिता बिरंजे, कविता शिंगाडे, सारिका लोखंडे, राधिका बुचडे, रेखा बिरंजे, राम आडके, स्वप्नील पाटील,ज्योतिबा पांडव इत्यादी मान्यवरांनी सहकार्य केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.संजीवनी हरिहर मॅडम यांनी केले व शेवटी आभार श्री लक्ष्मण पाटील सर यांनी केले. व या सर्व कार्यक्रमाचे नियोजन श्री शिवकुमार मुरतले सर यांनी केले हा कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला.

Post a Comment

Previous Post Next Post