दत्तवाड येथे महर्षी वाल्मिकी जयंती मोठ्या उत्साहाने साजरी




 प्रेस मीडिया वृत्तसेवा :  प्रतिनिधी :

      दत्तवाड :- तालुका शिरोळ येथील माने व कोळी समाजाच्या वतीने महर्षि वाल्मिकी जयंती  वाल्मिकी मंदिरात  मोठ्या उत्साहाने व भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आला.  रामायण गाथा ही श्लोक शैलीत लिहिले ते आधी कवी महर्षी वाल्मिकी ऋषी आज त्यांच्या जयंती निमित्त गावात दिंड्या  पताका सह पालखी मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी दत्तवाड च्या बांबरवाडी भजनी मंडळाने या दिंडीच्या वेळी त्यांची उपस्थिती लाभली होती .

या दरम्यान मिरवणुकीची सुरुवात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दौलतराव माने यांच्या निवासा पासून ते मुख्य देवस्थान मंदिरापर्यंत पालखी मिरवणूक काढण्यात आली होती.ही मिरवणूक आल्यानंतर या मंदिराच्या प्रांगणात, संगीत सुरांच्या सुरेल आवाजात बांबरवाडी भजनी मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम झाला.त्यानंतर या जयंतीच्या पार्श्वभूमीवर "महर्षी वाल्मिकी ऋषी महाराज की जय" या नामघोषाने पुष्पवृष्टी करण्यात आली त्यानंतर पंचारती करून प्रसाद वाटप करण्यात आली.ही जयंती कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व विद्यमान सदस्य स्वर्गीय बंडा आप्पा माने यांच्या पासून सुरुवात झाली ते आजतागायत माने व कोळी समाज बांधवांनी बंडा माने यांच्या कृपाशीर्वादाने आज हि जयंती साजरी करण्यात आली होती 

या कार्यक्रमा प्रसंगी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दौलतराव माने ,दत्तवाड कोळी समाजाचे अध्यक्ष आप्पासाहेब  कुरुंदवाडे ,उपाध्यक्ष संतोष माने ,अण्णासो कुरुंदवाडे ,बाबासो  माने, ,सोमनाथ माने, अण्णासो कोळी, कुमार कोळी, संजय माने ,तानाजी कोळी ,युवराज माने, सागर कोळी , संदीप कारदगे व अमोल कोळी, यांच्यासह समाजातील बंधू भगिनी मोठ्या उत्साहाने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post