पुण्यातील एका तरूणीला आपल्या आईचं दुसऱ्याशी लफडे असल्याचं समजलं ... वाचा सविस्तर



प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली नजीर शेख : 

 पुणे  : आपल्या आईचे एका व्यक्ती सोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती   तरुणीला समजली. याचा गैरफायदा घेत तरुणीने आपल्या प्रियकराच्या मदतीने आईला फोटो व्हायरल करण्याची धमकी देत लाखो रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे.

नेमका काय आहे प्रकार ?

फिर्यादी व्यक्तीचे आरोपी तरुणीच्या ४० वर्षाच्या आईसोबत प्रेमसंबध सुरु होते. या दोघांच्या प्रेम संबंधाचा सुगावा मुलीला लागला. आपल्या आईचं परपुरषासोबत प्रेम प्रकरण उघडकीस आणण्यासाठी मुलीने आपल्याच आईचं व्हॉट्सअ‍ॅप हॅक केलं. त्यावेळी तिला दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याची माहिती मिळाली. तसेच काही फोटो आणि व्हिडिओ देखील तिला मिळाले.

आईचे एका व्यक्तीसोबत प्रेमसंबंध असल्याचा सुगावा लागल्यानंतर तरुणीने आईचं व्हॉट्सअ‍ॅप हॅक केलं. त्यानंतर आईचे आणि तिच्या प्रियकराचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत १५ लाख रुपयांची खंडणी मागितली होती. परंतु आईच्या प्रियकराने पोलिसांत तक्रार केल्यानंतर मुलीचा भांडाफोड झाला आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांनी मुलीसह तिच्या प्रियकराला बेड्या ठोकल्या आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post