बोगस डाॅक्टरच्या चुकीमुळे मुलीचा बळी तर आता मुलीच्या वडीलांवर दबाव टाकण्यासाठी पोक्सा अंतर्गत खोटा गुन्हा दाखल



प्रेस मीडिया वृत्तसेवा :  विजय हूपरिकर : 

बोगस डाॅक्टरच्या चुकीमुळे मुलीचा बळी तर आता मुलीच्या वडीलांवर दबाव टाकण्यासाठी पोक्सा अंतर्गत खोटा गुन्हा दाखल. कल्याण पूर्व शहर येथे राहणारे पप्पु सहानी काही महिन्यांपूर्वी सुचकनाका येथील बोगस डाॅक्टर अन्सारी यांच्या कडे आपल्या मुलीच्या उपचारासाठी गेले  असता, चुकीच्या उपचारामुळे पप्पु सहानी यांच्या मुलीचे मयत झाले. या प्रकरणात बोगस डाॅक्टर विरोधात टिळकनगर पोलीस चौकी व कोळसेवाडी पोलिसांची मदत मागत असताना त्या आई वडिलांना कोणीही मदत करत नाही म्हणून त्यांनी आपल्या मुलीच्या मृत्यूला न्याय मिळावा म्हणून कल्याण न्यायालयात धाव घेतली. 

न्यायालयात त्यांनी खाजगी वकील करून डाॅक्टर विरोधात अर्ज दाखल केले होते दि. २७ सप्टेंबर या तारखेस पप्पू सहानी यांना न्यायालयात डाॅक्टर विरोधात सुनावणीसाठी हजर राहायचे होते. या प्रकरणाचा (अर्जाचा) राग बोगस डाॅक्टर याच्या मनात होता तसेच या प्रकरणात आदर्श (प्रविण) भालेराव यांचे नाव आल्याने, भालेराव यांनी इतर सहकारांच्या मदतीने सुनावणीच्या एक दिवस अगोदर (२६ सप्टेंबर) रात्री पप्पु सहानी यांच्या घरी जाऊन त्यांना मारहाण केली व लहान मुलीचा विनयभंग केला असे खोटे आरोप करून त्या मृत मुलीच्या वडिलांविरोधातच गुन्हा दाखल केला. मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणाचा पुढील तपास टिळकनगर पोलीस करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post