क्राईम न्यूज : लता परीटला न्याय देण्यासाठी प्रयत्नशील राहू.. राष्ट्रीय नेते बालाजी शिंदे


प्रेस मीडिया वृत्तसेवा :

इचलकरंजी.. आनंदा शिंदे. क्राईम रिपोर्टर :

आजरा तालुका मु पो .आल्याची वाडीतील लता परिट हिचा घातपात करून  गळा चिरून खून करण्यात आला. लता परिट आपल्या पती महादेव आणि दोन मुले आणि एक मुलगी यांच्या बरोबर आपली शेती व्यावसाय करीत आपल्या संसार घर प्रपांच करीत होती. लता परीट च्या मुलगीवर  गुरू प्रसाद हा एक तफी प्रेम करीत होता.  गुरप्रसाद देवराज माडभगत.वय २३ यांने लता परिट ही एकटी शेतात वैरण आणण्यासाठी गेलेली पाहून गुरपसाद यांनी डाव साधला.लता परिट हिच्यावर वार करून गळा चिरून तिच्या खून केला आणि प्रेतावर पालापाचोळा टाकून खून मी केला नाही या भावनेने गाव मध्ये वावरू लागला.


लता परिट ही एक ओ.बी सी . समाजातील परिट जातीतील होती.आणि गुरू प्रसाद हा मराठा समाजातील होता. मराठा समाजातील व वाडीतील एक राजकीय नेते चा मुलगा आहे म्हणून आपले कोणीही काहीही वाकडे करू शकणार नाही. या भ्रमात गुरूप्रसाद सतत लताच्या मुलगीचा पाठलाग करत होता. लता परिट व मुलगीने  लग्न करण्यास नकार दिला  आणि लता आपल्या मुलगीचा विवाह दुसरा ठिकाण करून दिला. लता परिट  हिच्या मुलगीचा विवाह सोहळा झाला नंतर मुलगी आपल्या सासरी जात असताना आरोपी गुरू प्रसाद गाडी मागे लावून दहा किलो मीटर पाठलाग करीत होता. म्हणून तोच राग चिड मनात धरून लता परिट हिचा काटा काढायचा असा मनांत पक्का विचार करून संधी ची वाट पाहत होत आणि दिनांक ९/९/२०२१ रोजी आपल्या गुरूने आपला डाव्या साधला लता परिट हिचा गळा चिरून तिच्या खून केला.  

सदरची बातमी आजरा तालुक्यात वाऱ्या सारखी पसरली , खूनी हल्ला प्रकरणं धोबी परिट समाजाचे राष्ट्रिय नेते आणि ओ बी सी महाराष्ट्र चे  श्री बालाजी शिंदे यांना समजताच लगेच शिंदें यांनी घटनेची माहिती घेऊन कोल्हापूर जिल्हातील सर्व पदाधिकाऱ्यांना फोन करून आपण सर्वांनी मा.पोलीस अधीक्षक  श्री शैलेश बलकवडे अधिकारीना निवेदन देऊन घडलेल्या घटना संदर्भात चर्चा करून कोल्हापूर घेऊन आजरा पोलिस अधीक्षच्या बरोबर देखील या घटनेची माहिती घेऊन तपास  गतीमान करून आरोपीस कडक्त शिक्षा व्हावी अशी निवेदन करण्यात आले. श्री बालाजी शिंदे यांच्या बरोबर. दत्तात्रय बन्ने संताजी शिंदे सागर परिट सरदार पोवार अभिजित सागंवकर उदय शिंदे. रामचंद्र परिट शशीकांत परिट मनोज परिट. पंकज पाटील रूपाली परिट नयना पोलोद अरुणा परिट शुभांगी परिट उत्तम शिंदे उदय परिट आणि गडहिंग्लज व आजरा तालुक्यातील महिला समाज बांधव हजर होते.

PRESS MEDIA

Chief Editor: Mehabub Sarjekhan

Post a Comment

Previous Post Next Post