विक्रम शिंगाडे यांचा निपाणीच्या शासकीय विश्रामगृहामध्ये थोर विचारवंतांच्या हस्ते गौरव पुर्वक सत्कार





प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

विक्रम शिंगाडे यांना इंडियन इंपायर डवलपमेंट चेन्नई युनिव्हर्सिटी तमिळनाडू यांच्या कडुन डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल थोर विचारवंत व साहित्यिक डॉ.अच्चुत माने, कायदेतज्ञ  एॅड अविनाश कट्टी, क्रांतीकारी चळवळीचे नेते मा.अशोक कुमार असोदे व समाजासाठी अहोरात्र परिश्रम करणारे सन्मानिय नेते सुधाकर माने अशा अनेक मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानपूर्वक गौरव करन्यात आले.तसेच भारतासाठी लढा दिलेले योध्दा पकाले सर यांचा देखील सत्कार करण्यात आला.

  साहित्यिक डॉ.अच्युत माने यांनी आपल्या मनोगतामध्ये समाजाला दिशा देण्याचे अत्यंत गरज आहे. समाजामध्ये परिवर्तन होने ही काळाची गरज आहे. अशा अनेक उदाहरणे देऊन समाजाचा विकास होने गरजेचे आहे. आमच्या भागांमध्ये डॉ.विक्रम शिंगाडे हे अनेक समाजाला प्रेरणा देण्याचे काम सतत करत असतात. असे ते म्हणाले. विक्रम शिंगाडे यांचे सर्वांनी प्रेरणा घेन्यासारखे आहे. असेही म्हणाले. 

  तसेच कायदेतज्ञ एॅड अविनाश कट्टी यांनी सुध्दा मनोगतामध्ये विक्रम शिंगाडे यांचे भरभरून अभिनंदन केले. डॉ. विक्रम शिंगाडे सारखा लढाऊ कार्यकर्ता होणे गरजेचे आहे. त्यांना डॉ. पदवी मिळाली हे तालुक्याचे भाग्य आहे. निपाणी ही चळवळीची भुमी असुन हा सत्कार समारंभ या नगरीत होत आहे हे अभिमानास्पद आहे. असे कार्य करणाऱ्यांचे नेहमी सत्कार होत रहावे असे ते म्हणाले. 

   समाजसुधारक मा. अशोक कुमार असोदे आपल्या मनोगतामध्ये म्हणाले की माझ्या एवढ्या मोठ्या सामाजिक कार्यामध्ये माझ्या साठी हा क्षण अविस्मरणीय आहे. सामाजिक क्षेत्रातील डॉक्टरेट पदवी मिळवणे म्हणजे एवढे सोपे नाही. ते डॉ. विक्रम शिंगाडे यांनी मिळवले यांचे आम्हाला कौतुक वाटते. असे म्हणाले विक्रम सारखे लढाई कार्यकर्ते होने आता काळाची गरज आहे. समाज परिवर्तन करण्यासाठी एकत्र येऊन काम केले पाहिजे असे ते म्हणाले. 

  कार्यक्रमाचे प्रमुख व गौरव समितीचे अध्यक्ष सुधाकर माने  यांनी प्रास्ताविक मध्ये डॉ. विक्रम शिंगाडे यांनी अनेक सामाजिक कार्य केलेल्यांची पाठच वाचुन दाखविले. गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून समाजाला प्रेरणा व दिशा देण्याचे काम सतत करत असतात. समाजाचे रखवालदार म्हणुन कार्य करीत आहेत. असे ते म्हणाले. अशा अनेक मनोगतामध्ये शिंगाडे यांना अभिनंदन चा वर्षाव शब्दातुन होत होता.   या कार्यक्रमासाठी शासकीय हाल सामाजिक कार्यकर्तेना भरला होता. 

   विक्रम शिंगाडे हे सत्काराला उत्तर देताना म्हणाले मी गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक कला क्रिडा अशा अनेक क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करीत आलो आहे . तसेच गोर गरीब शोषित पिडीत यांच्या हक्कासाठी अहोरात्र परिश्रम करीत आहे. प्रत्येक समाजामध्ये प्रेरणा देण्यासाठी पुरस्काराचा निमीत्ताने त्यांच्या पाठीवर थाप मारत असतात. व विद्यार्थ्यांना सहकार्य करीत असतात. डॉक्टरेट पदवी ही या सर्व कार्यातुनच प्राप्त झाली आहे. याचे सर्व श्रेय प्रत्येक समाजाला जाते. अशा आपल्या मनोगतामध्ये म्हणाले. 

   त्यावेळी रेखा कांबळे, अशोक लांडे, प्रा. शरद कांबळे, अॅड राहुल वराळे, हरिष सनदी, अविनाश माने, सुशिल कांबळे, नवनाथ शिंगे, निलेश सनदी, अॅड थरकार असे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम निपाणी येथे पार पडलाकार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार अंजली यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post