माणुसकी फौंडेशनच्या उपक्रमातून अकुरीला मिळाले नवजीवन



प्रेस मीडिया वृत्तसेवा :  अकिवाट : 

      माणुसकी फौंडेशन- इचलकरंजी, शाखा अकिवाट चे वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. अकुरी बाळासो कांबळे वय १५ वर्ष, या मुलीला ऐकायला व बोलायला येत नव्हते या शिबिरात तपासणी मुळे ती ऐकु व बोलू लागली. यामुळे शिबीर घेतल्याचा सार्थक झाला असल्याचे आनंद संयोजक माणुसकी फौंडेशन शाखा अकिवाटच्या कार्यकर्त्यांनी  व्यक्त केले.त्या मुलीला श्रवणयंत्र लावून तपासणी केल्यामुळे तिला एक वेगळाच आनंद झाला. तिच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून फाऊडेशनचे कार्यकर्त्यांना ही समाधान झाले. माणुसकी फौंडेशनच्या कार्यकर्त्यांनी अकुरीला मोफत मशिन देण्याची जबाबदारी स्वीकारली.

 या शिबिरात कुरुंदवाडच्या सिताराम रुग्णालयाचे जनरल फिजीशियन व मधुमेह तज्ञ - डाॅ.सारंग कोकाटे, अस्थिरोग तज्ञ- डॉ.ऋषिकेष कोकाटे, बालरोग तज्ञ- डॉ.शितल कोकाटे तर कृष्णा स्पिच थेरपी सेंटर अॅण्ड हिअरिंग क्लिनिक इचलकरंजीचे अॅडोलाजीस्ट संतोष राठोड व रविंद्र बोरूडे यांनी रूग्णांची तपासणी करून मोफत व योग्य मार्गदर्शन केले.

शिबिरात अतिशय सुटसुटीत आणि काटेकोर नियोजन करण्यात आले होते. कानाची समस्या , गुडघे ,कंबर आणि मणकादुःखी ,लहान मुलांच्या समस्या, रक्तदाब तपासणी या सर्व रुग्णांकरिता वेगवेगळे विभाग होते. त्यामुळे रुग्णांना शिबिराचा लाभ घेणे ही सुरळीत झाले.या मोफत आरोग्य शिबिरात तज्ञ डॉक्टर्स आणि विविध वैद्यकीय साहित्याच्या उपलब्धतेमुळे 160 पेक्षा जास्त लोकांनी याचा लाभ घेतला. माणुसकी फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रवी जावळे यांनी शिबिरात आलेल्या रुग्णांची चौकशी केली. गावचे सरपंच विशाल चौगुले,माजी जिल्हा परिषद सदस्य-इकबाल बैरगदार यांनी माणुसकी फौंडेशन च्या या उपाक्रमाचे कौतुक केलं. शाखाध्यक्ष-रमेश कांबळे यांनी माणुसकी फौंडेशनच्या या उपक्रमाला दिलेल्या सहकार्याबद्दल सर्वांबद्दल आभार प्रकट केलं .

यावेळी बाळासो पाटील, संदिप नरवाडे,राजू कांबळे ,पत्रकार गणपती कागे,आण्णासाहेब कागले उपस्थित होते.तर माणुसकी फौंडेशनचे  विजय माने, डॉ. संजय माने,महेश कांबळे, योगेश कांबळे,सौरभ कांबळे, संतोष कांबळे,शशि कांबळे, सोमनाथ कांबळे,मनोज माने, राकेश कांबळे, तुषार कांबळे, स्वप्निल माळगे,अमित माळगे, विकास कांबळे, अंकित कांबळे, गजेंद्र कांबळे, वेदांत कांबळे, किशोर गस्ते, अभिषेक कांबळे ,बालाजी मंडप डेकोरेशनचे सुरज खोत व यशसिद्धी मंडप डेकोरेशनचे विजय माने यांनी सहकार्य केले.शिबिराचे उद्घाटनप्रसंगी स्वागत व प्रस्तावना  रमेशकुमार मिठारे यांनी केले तर सुत्रसंचालन व आभार हेमंत कांबळे सर यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post