मुंबई पोलीस दलातील तीन पोलिस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल.

 


प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

खोटय़ा गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवून 17 लाख रुपये उकळल्याप्रकरणी मुंबई पोलीस दलातील पोलीस उपायुक्त अकबर पठाण, पोलीस निरीक्षक सुनील माने आणि एका अधिकाऱ्या विरोधात अंबोली पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे.एकाच वेळी तीन अधिकाऱयांविरोधात गुन्हा दाखल झाल्याने मुंबई पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

तक्रारदार हे प्रॉपर्टी डीलर असून ते अंधेरी परिसरात राहतात. 2019 ते 2020 या काळात तक्रारदारांना खोटय़ा गुह्यात अडकवण्यासाठी पोलीस अधिकाऱयांनी खबऱयामार्फत 17 लाख रुपये उकळले गेले. पैसे देऊनदेखील वारंवार पैशाची मागणी केली जात होती. आणखी पैसे न दिल्यास फसवणुकीच्या गुह्यात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्या गुह्याचा तपास क्राइम ब्रँच युनिट-10 कडे सोपवला गेला. त्यानंतर मारहाण करून कोऱया कागदावर सह्या केल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. अखेर तक्रारदारांनी न्यायालयात धाव घेतली.

न्यायालयाच्या आदेशानुसार अंबोली पोलिसांनी पोलीस उपायुक्त अकबर पठाण, तुरुंगात असलेले पोलीस निरीक्षक सुनील माने आणि सध्या पोलीस सेवेत असलेल्या पोलीस अधिकाऱयाविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या गुह्याचा तपास आता अंबोली पोलीस करणार आहेत. काही दिवसांपूर्वी एका विकासकाने दिलेल्या तक्रारीवरून मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह, अकबर पठाण यांच्या विरोधात मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

Post a Comment

Previous Post Next Post