दिल्लीतील दलित मुलीच्या बलात्कार आणि निर्घृण हत्येप्रकरणी दोषींना फाशीची शिक्षा द्या - केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले



प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

मुंबई दि. 5 - दिल्लीतील जुन्या नांगल स्मशानभूमी येथे अवघ्या 9 वर्षांच्या दलित मुलीची बलात्कार करून निर्घृण हत्या प्रकरणी दोषी गुन्हेगारांना कठोरात कठोर फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केली आहे. 

बळीत दलित मुलीच्या शोकाकुल कुटुंबियांची केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज  सांत्वनपर भेट घेतली.

दिल्लीतील या 9 वर्षांच्या दलित मुलीची बलात्कार करून हत्या केल्यानंतर तिचा जबरदस्ती अंत्यविधी म्हणत तिचा मृतदेह जाळण्याची क्रूर अमानुष हृदयद्रावक घटना घडली असून या घटनेने माणुसकीला काळिमा फासण्यात  आला आहे.या प्रकरणी आपण गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन पीडित दलित परिवाराला न्याय मिळवून देण्यासाठी आरोपीना कठोरात कठोर फाशीची शिक्षा करण्याची मागणी करणार असल्याचे ना रामदास आठवले म्हणाले.या अमानुष गुन्ह्यात 4 आरोपीना अटक करण्यात आली आहे. चार ही आरोपीना फाशीची शिक्षा झाली पाहिजे या साठी जलद गती न्यायालयात खटला चालविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ना रामदास आठवले म्हणाले. 



            

Post a Comment

Previous Post Next Post