मोदी सरकारच्या विरोधात काळा दिवस पाळण्याचा इशारा आज कामगार संघटनांच्या वतीने देण्यात आला.



केंद्रातील भाजप सरकारने लोकशाहीला पायदळी तुडवत हुकूमशाहीकडे वाटचाल सुरू ठेवली आहे. बहुमताच्या जोरावर शेतकरी व कामगार आणि जनविरोधी कायदे चर्चा न करता मंजूर केले जात आहेत. अशा परिस्थितीत 26 मे रोजी मोदी सरकार सात वर्षे पूर्ण करीत आहे. त्यामुळे या दिवशी मोदी सरकारच्या विरोधात काळा दिवस पाळण्याचा इशारा आज कामगार संघटनांच्या वतीने देण्यात आला.

जनआंदोलन संघर्ष समितीचे (महाराष्ट्र) निमंत्रक विश्वास उटगी, उल्का महाजन, प्रकाश रेड्डी, अजित पाटील, संजीव साने यांनी ऑनलाइन पत्रकार परिषदेत या आंदोलनाची माहिती दिली.केंद्रातील मोदी सरकार सात वर्षे पूर्ण करीत असताना दिल्लीच्या सीमेवर लाखो शेतकरी ठाण मांडून बसले आहेत, पण त्यांच्याकडे वेळ

देण्यास मोदी सरकारला वेळ नाही

शेतकऱयांच्या आंदोलनाला सहा महिने होत आहेत.शेतकरीविरोधी तीन जुलमी कायदे रद्द करण्याऐवजी संपूर्ण शेतीव्यवस्थाच अदानी, अंबानी, वॉलमार्टच्या ताब्यात देण्याचे कारस्थान भाजपचे सरकार या तीन कायद्यांच्या द्वारे करत आहे. तसेच कामगारांनी लढून मिळवलेले मूलभूत अधिकार गुंडाळून कामगार कायदे केवळ आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट गुंतवणूकदारांसाठी बनविण्याचा सरकारने कोरोनाच्या आरोग्य आणीबाणीत डाव साधला आहे. त्यामुळे येत्या 26 मे रोजी शेतकरी, कामगार व सर्व 120 जनहित संघटना देशात ठिकठिकाणी काळे झेंडे लावून पेंद्र सरकारचा निषेध करणार आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post