शुक्रवारच्या 'फेसबुक लाईव्ह' नमाज पठणला प्रतिसाद

                                                             



पुणे: कोरोना विषाणू साथीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील आझम कॅम्पस मशिदीत शुक्रवार (जुम्मा ) नमाजचे 'फेसबुक लाईव्ह' द्वारे थेट प्रक्षेपण करण्यात येत आले . ९ एप्रिल  रोजी शुक्रवारी दुपारी दीड वाजता करण्यात  आलेल्या ऑनलाईन नमाज पठणास चांगला प्रतिसाद मिळाला . आझम कॅम्पस शैक्षणिक,सामाजिक परिवाराचे अध्यक्ष डॉ.पी.ए.इनामदार यांनी पत्रकाद्वारे या उपक्रमाची माहिती दिली. 

मशिदीच्या पेश इमाम यांच्या मार्गदर्शनाखाली घरी  नमाज पठण करणे नव्या तंत्रज्ञानाच्या वापराने शक्य झाले असून मागील वर्षी २९ मे २०२० पासून हा उपक्रम   सुरु करण्यात आला होता . यावर्षी प्रथमच निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर ९ एप्रिल रोजी फेसबुक लाईव्ह द्वारे नमाज पठण करण्यात आले . अशा स्वरूपाचा हा पहिलाच उपक्रम आहे.या तंत्रामुळे मशिदीत गर्दी होत नाही,फक्त पेश इमाम मशिदीतून नमाज पठण करतात आणि इतरांना घरातून त्यात सहभागी होणे शक्य होते.दर शुक्रवारी दुपारी दीड वाजता हा उपक्रम होईल .

एरवी शहराच्या विविध भागात मशिदींमध्ये शुक्रवार (जुम्मा) दिवशी सामूहिक नमाज पठण केले जाते.कोरोना संसर्गचा  धोका लक्षात घेऊन  शुक्रवारी मशिदीत जाता येत  नाही. त्या सर्वांना या फेसबुक लाईव्ह नमाज पठणाचा लाभ होत आहे.आझम कॅम्पस या फेसबुक पेज वर हे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येते.प्रशासनाने दिलेल्या सर्व सूचनांनुसार सोशल डिस्टन्स चे नियम पाळण्यात येतात. पुढील लिंक द्वारे या नमाज पठणात सहभागी होता येते.  https://www.facebook.com/azamcampus1922

  .आझम कॅम्पस च्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख अमीन शेख यांनी तांत्रिक बाजू सांभाळली .  

                                                                                                      

Post a Comment

Previous Post Next Post