साप्ताहिक सकाळचे माजी संपादक, ज्येष्ठ व्यासंगी पत्रकार व लेखक असलेल्या सदा डुंबरे यांचे निधन.



 सदा डुंबरे मराठी पत्रकारितेतील एक आदरणीय व्यक्तिमत्त्व.साप्ताहिक सकाळचे माजी संपादक, ज्येष्ठ व्यासंगी पत्रकार व लेखक असलेल्या  सदा डुंबरे आज गुरुवार ता. २५ फेब्रुवारी २०२१ रोजी संध्याकाळी वयाच्या बहात्तराव्या वर्षी पुण्यात कालवश झाले.गेले दहा- बारा दिवस ते कोव्हिडमुळं हॉस्पिटलमध्ये दाखल होते. 'प्रतिबिंब -१९९०' पासुन 'सदा सर्वदा ' पर्यन्त अनेक पुस्तके त्यांच्यातील अभ्यासू लेखकाचे दर्शन घडवतात.तसेच संपादक  या नात्यानेही त्यांनी  महाराष्ट्राच्या संस्कृतीक जीवनात मौलिक स्वरूपाची कामगिरी केली..सदा डुंबरे हे समाजवादी प्रबोधिनीचे हितचिंतक होते.तसेच प्रबोधिनीच्या 'प्रबोधन प्रकाशन ज्योती ' मासिकाचे नियमित वाचक होते.कोव्हीडच्या थैमानात एक ज्येष्ठ स्नेही,मार्गदर्शक आज गमावला आहे.समाजवादी प्रबोधिनी परिवाराची सदा डुंबरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन...

Post a Comment

Previous Post Next Post