निवडणुकीच्या तोंडावर सादर झालेल्या या अंदाजपत्रकात पुणेकारांवर योजनांचा पाऊस



पुणे : महापालिकेचे 2021- 22 या आर्थिक वर्षाचे 8 हजार 370 कोटींचे अंदाजपत्रक ऑनलाईन मुख्य सभेत सादर स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी हे अंदाजपत्रक सादर केले असून निवडणुकीच्या तोंडावर सादर झालेल्या या अंदाजपत्रकात पुणेकारांवर योजनांचा पाऊस पाडण्यात आला आहे.तब्बल 83 योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. मात्र, त्याच वेळी करोनामुळे घटलेले महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यावर भर न देता शहरातील तुळशीबाग, नेहरू स्टेडियम, पेशवे उद्यान, सारसबाग तसेच अनेक रस्ते पीपीपी वर विकसित करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. तर आरोग्य सुविधा उभारण्यावर विशेष भर देण्यात आला आहे.

दरम्यान, स्थायी समिती अध्यक्ष रासने यांनी आपल्या प्रभागात शून्य बजेट घेतले असून आपल्यावर शहराचे उत्पन्न वाढविणे आणि शहर विकासाची जबाबदरी असल्याने हा निर्णय घेतला असल्याचे ते म्हणाले.प्रभावी महसूल वाढ, आरोग्य सुविधा, गतिमान वाहतूक, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, पाणीपुरवठा, नदी सुधारणा, घनकचरा व्यवस्थापन, पर्यावरण, खासगी सहभागातून विकास, शिक्षण, क्रीडा, समाविष्ट गावे, परवडणारी घरे, स्मार्ट सिटी, समाजकल्याणकारी योजना, उद्योग, विद्युत, माहिती तंत्रज्ञान, पथारी व्यावसायिक पुनर्वसन, अतिक्रमण, आपत्ती व्यवस्थापन, कामगार कल्याण या विभागांसाठी अंदाजपत्रकात प्रस्तावित करण्यात आल्या असल्याचे रासने यांनी स्पष्ट केले.

महापौर मुरलीधर मोहोळ, सभागृह नेते गणेश बिडकर, उपमहापौर सरस्वती शेंडगे, विरोधीपक्ष नेत्या दिपाली धुमाळ यांच्यासह गटनेते यावेळी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post