मिरज शासकीय महाविद्यालय परिसरात अति विशेषउपचार (सुपरमल्टीस्पेशालिट) रुग्णालय उभारणार. सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर




मिरज-

मिरज येथील शासकीय रुग्णालय परिसरात सध्या रुग्णालय सुरू आहे पण या रुग्णालया कडील गर्दी पाहता या ठिकाणी लवकरच अतीविशेषउपचार (सुपरमल्टीस्पेशालिटी)

रुग्णालय उभे करण्यासाठी आवश्यक त्या बाबी पूर्ण करण्यासंबंधीच्या सूचना सर्व संबंधित विभागांना दिल्या असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली,

मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरात नव्याने उभारण्यात येणाऱ्या रुग्णालयासाठी महाविद्यालयाकडे उपलब्ध असलेल्या जागेची पाहणी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केली, मिरज शासकीय महाविद्यालय परिसरात सध्या अस्तित्वात असलेल्या रुग्णालयाकडे सांगली-कोल्हापूर जिल्ह्याबरोबरच शेजारच्या कर्नाटक राज्यातून व कोकण विभागातून अनेक प्रकारचे रुग्ण उपचारासाठी येत असतात त्यामुळे वाढती रुग्णसंख्या पाहता या ठिकाणी विशेषउपचार सुपरमल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभे रहावे अशी मागणी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती अशी माहिती राज्यमंत्री यड्रावकर यांनी दिली आहे, अकोला, यवतमाळ, लातूर व औरंगाबाद या ठिकाणी सुरू होत असलेल्या सुपर मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल प्रमाणे या ठिकाणचा रुग्णालय बांधकामाचा प्रस्ताव शासनाकडे तातडीने सादर करावा अशा सूचना राज्यमंत्री यड्रावकर यांनी उपस्थित असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या, यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ.प्रदीप दीक्षित, अधिष्ठाता समन्वयक अधिकारी डॉ. रुपेश शिंदे, डॉक्टर रजनी जोशी डॉक्टर शेखर प्रधान डॉक्टर शिशिर मिरगुंडे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता रोकडे, सहाय्यक उपअभियंता अबूबकर शेख उपस्थित होते,

Post a Comment

Previous Post Next Post