राज्यात ग्राम पंचायत निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे 4 हजार सदस्य विजयी*



निवडणुकीतील वाद विसरून  निवडून आलेल्या सदस्यांनी  एकदिलाने  गावाच्या विकासासाठी काम करावे - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले


मुंबई दि.19 - राज्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाने चमकदार कामगिरी केली असून 4 हजार पेक्षा अधिक सदस्य रिपाइं चे  निवडून आले आहेत. राज्यात भजप आणि आरपीआयला ग्राम पंचायत निवडणुकीत बहुमत लाभले असून राज्यात भाजपवरच  जनमानसांचा विश्वास असल्याचे या निवडणुकीत सिद्ध झाले आहे असा दावा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना रामदास आठवले यांनी आज केला. निवडून आलेल्या ग्राम पंचायत सदस्यांनी निवडणुकीत झालेले वाद बाजूला सारून एकदिलाने गावाच्या विकासासाठी निष्पक्षपणे काम करावे असे आवाहन ना रामदास आठवले यांनी केले आहे.

राज्यात 12 हजार 711 ग्राम पंचायती च्या झालेल्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचा अंदाजे 100 ग्राम पंचायतीवर निळा झेंडा फडकला असून संपूर्ण राज्यात ग्राम पंचायत निवडणुकीत  4 हजारहुन अधिक सदस्य रिपब्लिकन पक्षाचे निवडून आले आहेत. अशी माहिती  रिपाइं चे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस राजाभाऊ सरवदे यांनी दिली. सोलापूर जिल्ह्यात रिपब्लिकन पक्षाने स्वबळावर निवडणुका लढविल्या असून येथील अक्कलकोट तालुक्यातील गावात रिपाइं ने भाजप काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी आशा सर्व पक्षांना दणका देत स्वबळावर सर्व उमेदवार निवडून आणून ग्राम पंचायतीवर निळा झेंडा फडकविला असल्याची माहिती राजभाऊ सरवदे यांनी दिली आहे. 

ग्रामीण भागात रिपब्लिकन पक्षाची जनतेशी नाळ घट्ट आहे. अनेक ठिकाणी स्वबळावर तर राज्यभरात बहुतांश ठिकाणी भाजप शी युती करून रिपाइं ने ग्राम पंचायत निवडणूक लढविली आहे. त्यात रिपाइं चे 4 हजार हुन अधिक निवडून आल्याचा दावा ना रामदास आठवले यांनी केला  आहे. 



              

Post a Comment

Previous Post Next Post