सहायक पोलिस आयुक्त सुजाता पाटील यांना पी एस युनिट सेल चे निवेदन.


सहायक पोलिस आयुक्त सुजाता पाटील यांना पी.एस.युनिट सेल चे निवेदन



सेंट्रल प्रेस जर्नलिस्ट असोसिएशन (केंद्रीय पत्रकार संघ, सी.पी.जे.ए.) तर्फे सहायक पोलिस आयुक्त सुजाता पाटील यांना दिले गेले निवेदन 

PRESS MEDIA LIVE : मुंबई :

सेंट्रल प्रेस जर्नलिस्ट असोसिएशन (केंद्रीय पत्रकार संघ, सी.पी.जे.ए.) च्या "पोलीस सेवा युनिट" सेल च्या माध्यमातून "खाकीचे मित्र" या राष्ट्रीय अभियानाअंतर्गत दिनांक ०६ जानेवारी २०२१ रोजी सहायक पोलिस आयुक्त सुजाता पाटील (जोगेश्वरी, मेघवाडी विभाग) यांना निवेदन दिले गेले. या निवेदनात पोलिसांना कोणत्याही सणादरम्यान अथवा कोणत्याही कारणास्तव स्वयंसेवक म्हणून जेव्हा गरज भासेल तेव्हा पुलिस सेवा युनिट तर्फे मदत केली जाईल असे नमूद केले आहे.

सेंट्रल प्रेस जर्नलिस्ट असोसिएशन (केंद्रीय पत्रकार संघ, सी.पी.जे.ए.) चे राष्ट्रीय अध्यक्ष संदिप कसालकर तसेच उपाध्यक्ष कमलेश गायकवाड यांच्या संकल्पनेतून पुलिस सेवा युनिट सेल ची स्थापना करण्यात आली असून पी.एस.युनिट या सेल चे राष्ट्रीय महासचिव महेंद्र तिवारी यांच्या मार्गदर्शनानुसार खाकीचे मित्र हे राष्ट्रीय अभियान संपूर्ण देशभरात राबविण्यात येणार आहे.


काही दिवसांतच महाराष्ट्र दौरा सुरू करण्यात येणार असून संपूर्ण महाराष्ट्रातील पोलीस स्थानकात वैयक्तिकरित्या जाऊन हे निवेदन देण्यात येणार असल्याचे पी.एस.युनिट या सेल च्या महाराष्ट्र महिला मोर्चा महिला अध्यक्षा रश्मी मेहता यांनी सांगितले आहे.सदर निवेदन सादर करताना राष्ट्रीय अध्यक्ष संदिप कसालकर यांच्या सोबत महाराष्ट्र महिला मोर्चा अध्यक्षा रश्मी मेहता तसेच मीरा भायंदर महिला अध्यक्षा मनीषा पोंडा, उपाध्यक्षा पदमा पटेल तसेच चेतना आचार्य उपस्थित होते.

दरम्यान सहायक पोलिस आयुक्त सुजाता पाटील यांनी संपूर्ण पी. एस. युनिट सेल चे कौतुक करीत शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

Previous Post Next Post