AdSense code पुणे: हांडेवाडी चौकात अतिक्रमण वाढली.

पुणे: हांडेवाडी चौकात अतिक्रमण वाढली.

 हांडेवाडी चौकात अतिक्रमण वाढली.

PRESS MEDIA LIVE :. पुणे : प्रतिनिधी :

पुणे - शहराची वाटचाल ही स्मार्ट सिटीकडे होत आहे. पण, अनधिकृत टपऱ्या, पत्राशेड यांमुळे काही परिसरांत बकालपणा वाढला आहे. विशेषतः हडपसर-हांडेवाडी रस्ता व श्रीराम चौक परिसरात अशा टपऱ्या आणि पत्राशेड, तसेच भंगार दुकानांची संख्या जास्त आहे. अतिक्रमणांमुळे या परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. अनधिकृत व्यवसायांमुळे गुंडगिरी आणि हफ्तेखोरीही वाढली आहे.

हांडेवाडी रस्ता, ससाणेनगर-सय्यदनगर आणि महंमदवाडी रस्त्यावर सार्वजनिक मोकळ्या तसेच काही ठिकाणी खासगी जागांवर पत्राशेड उभारण्यात आली आहेत.एखाद्या ठिकाणी व्यावसायिकाने अनधिकृत अतिक्रमण केले, की याची संख्या वाढत जाते. पण, त्यावर कारवाई होत नाही. बऱ्याचदा कारवाईवेळी वाद वाढतात.

अतिक्रमण होत असतानाच अनेक नागरिक पालिकेला कळवतात, परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जाते. हांडेवाडी रस्त्यावरील अशोकनगर, कोहिनूर आणि रुनवाल सिगल सोसायटी परिसरात अनेकांनी बिनधास्तपणे अनधिकृत पत्राशेडची दुकाने थाटली आहेत. येथे श्रीराम चौकात एकीकडे सुशोभीकरणासाठी लाखो रुपये खर्च केला जात आहे, तर त्याच परिसरातील रस्त्याकडेला पत्राशेड उभारली आहेत. यामुळे बकालपणा वाढत जातो आहे.

समन्वयाचा अभाव
हडपसर-हांडेवाडी रस्त्यावरील अतिक्रमाणांवर कारवाईसाठी विविध संघटनांनी वेळोवेळी आंदोलने केली. त्यावेळी केवळ फार्स करण्यात आला. मात्र, पुन्हा त्याच ठिकाणी अतिक्रमणे वाढली. यावर अतिक्रमण नियंत्रण विभाग आणि बांधकाम विभाग एकमेकांकडे बोट दाखवून कारवाईस का टाळाटाळ करत आहेत, असे येथील सोसायटी धारकांचे म्हणणे आहे. यामुळे प्रशासनाच्या कारभाराविषयी साशंकता निर्माण होत आहे.

पत्राशेडमध्ये चायनीज, मद्यपान
परिसरातील अनधिकृतपणे पत्राशेड भाड्याने देण्यात येतात. येथे चायनीज सेंटर सुरू असून रात्री मद्यपान करून गोंधळ होण्याच्या घटना घडत आहेत. यातूनच गुन्हेगारी वाढते. पोलिसांनी येथे नियमित कारवाई करण्याची मागणी सोसायटीधारकांनी केली आहे.

Post a comment

0 Comments