केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले.


 

दिवंगत केंद्रीयमंत्री रामविलास पासवान यांची रिपब्लिकन पक्षाच्या वतीने उद्या दि. 17 ऑक्टोबर रोजी जाहीर श्रद्धांजली सभा - केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले

PRESS MEDIA : 

 मुंबई दि. 16 -   दलितांचे देशातील लोकप्रिय नेते; लोकजनशक्ती पक्षाचे संस्थापक केंद्रीय कॅबिनेट मंत्री दिवंगत रामविलास पासवान यांना श्रद्धांजली अर्पण करणाऱ्या जाहीर सभेचे आयोजन  शनिवार दि. 17 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता सांताक्रूझ  पूर्वेतील कालीना येथील भीमछाया सांस्कृतिक केंद्राच्या सभागृहात करण्यात आल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी दिली आहे. 

दिवंगत केंद्रीयमंत्री रामविलास पासवान यांच्या जाहीर श्रद्धांजली सभेस  केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले; खासदार पूनम महाजन; आमदार मंगल प्रभात लोढा; आमदार कपिल पाटील; लोजपा चे शमीम हवा; रिपाइं चे राष्ट्रीय सरचिटणीस माजी मंत्री अविनाश महातेकर; 

 काकासाहेब खंबाळकर; रवी गरुड आदी मान्यवर उपस्थित राहणार असून सभेच्या अध्यक्षस्थानी रिपाइं चे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे  असल्याची माहिती रिपाइं तर्फे प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.             

            

Post a comment

0 Comments