रिपब्लिकन पक्षात या समाज सेवकांचा जाहीर प्रवेश.


 केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवलेंच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षात के एल गायकवाड आणि  अली अहमद खान या समाजसेवकांचा जाहीर प्रवेश


PRESS MEDIA LIVE :. मुंबई :

मुंबई दि.1 - केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षात अंधेरी भागातील ज्येष्ठ अनुभवी  समाजसेवक के एल गायकवाड आणि समाजसेवक अली अहमद खान यांनी नुकताच जाहीर प्रवेश केला.ना.रामदास आठवले यांच्या  बांद्रा पूर्वेतील संविधान निवासस्थानी आली अहमद खान आणि के एल गायकवाड;टोनी रेगो; संजय बांदिवडेकर; रियाज अहमद  यांनी रिपाइं मध्ये प्रवेश केला.यावेळी रिपाइं चे झोपडपट्टी महासंघाचे सरचिटणीस रतन अस्वारे ;विलेपार्ले तालुका अध्यक्ष दीपक साळवी; राजेंद्र कांबळे; सुदेश कडवे; गौतम कांबळे; सचिन पांचाळ; आदी अनेक मान्यवर उपस्थित होते. 

विविध जाती धर्माचे भाषेचे लोक रिपब्लिकन पक्षात प्रवेश करीत आहेत. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्षाचा येत्या दि. 3 ऑक्टोबर रोजी 63 वर्धापनदिन असून त्या पार्श्वभूमीवर रिपाइंमध्ये या समाजसेवकांनी पक्षप्रवेश केला असल्याची माहिती रतन अस्वारे यांनी दिली आहे.

Post a comment

0 Comments