कोणत्याही क्षणी मोर्चा

जयसिंगपूरच्या  युथ डेव्हलपमेन्ट  को-ऑप   बँकेवर  कोणत्याही क्षणी  मोर्चा           

PRESS MEDIA LIVE : जयसिंगपूर :. मेहबूब सय्यद :

 ग्राहकांनी बँकेवर ठेवला विश्वास त्या विश्वासाला पात्र न राहता वरिष्ठ अधिकार्‍यांचा मनमानी कारभार उडवाउडवीची उत्तरे पावणे दोन वर्षे होत आली युथ डेव्हलपमेन्ट को- ऑप. बँक लि.कोल्हापूर शाखा जयसिंगपूरातील च्या  विरोधात ठेवीदार  ग्राहक खातेदार करोडो रुपयांच्या ठेवी बँकेत अडकून   असल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांची जगणे मुश्किल झाले आहे. कोरोना संसर्गामुळे व्यवसाय उद्योग पूर्णपणे मोडून पडला आहे त्यामुळे कामगारांना काम नाही जगायचं कसं हा प्रश्न निर्माण झाला आहे  यात स्वतःचे पैसे पण रिझर्व्ह बॅंकेचे निर्बंध असल्याचे कारण सांगून सहा महिने करत एक वर्ष नऊ महिने होत आले आहेत .बँकेतील संचालक मंडळ ठोस निर्णय घ्यायला तयार नाही बँक चालू होणार की बंद करणार याचे उत्तर बँकेतील कर्मचारी काही देत नाही ज्या संचालकांनी रिझर्व बँकेकडे लेखी अर्ज देऊन बँक चालू करणार आहोत की बँक बंद करणार आहोत किंवा दुसऱ्या बँकेत विलीनीकरण होणार आहे असे काहीच उत्तर द्यायला तयार नाही आज उद्या आज उद्या करत दिवस पुढे ढकलत आहेत ग्राहक ठेवीदार खातेदार  यांचे कोरोना या संसर्ग या आजारामुळे 20 मार्च पासून आज तागायत लॉकडाऊनमुळे ग्राहकांचे जगणे मुश्किल झाले आहे.   स्वतःचे हक्काचे पैसे द्यायला बँक टाळाटाळ करत आहे. आता नाही उद्या असे करत दोन-तीन  बघूया असे करत दिवस ढकलत आहेत बँकेतील कर्मचारी  ग्राहकांशी  उडवाउडवीची उत्तरे देत आहे. बँकेच्या संचालक मंडळाचा वेळकाढू धोरणामुळे आता बँक चालू होईल कि नाही याची शाश्वती कमी  तुम्हाला तुमचे पैसे मिळतील  असं करत दीड वर्ष झाले थोड्या दिवसात  एक वर्षे नऊ महिने पूर्ण होणार  अजून ग्राहकांना एक रुपया चा पत्ता नाही काही अधिकारी तोंड पाहून काम करत आहेत. बँकेच्या मनमानी कारभाराविरोधात   खातेदार ठेवीदार सर्व ग्राहक  यांच्या बँकेवर कोणत्याही  मोर्चा काढण्यात येणार आहे बँकेच्या संचालक मंडळाने ग्राहकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये अन्यथा कोणत्याही क्षणाला धडक मोर्चा काढला जाईल.यावेळी  ग्राहकांनी आपल्या भावना लेखी स्वरूपात मेहबूब सय्यद जयसिंगपूर यांच्याकडे द्यावेत हा मेसेज सर्व व ठेवीदार ग्राहक खातेदार यांना या व्हाट्सअप द्वारे आपल्याला कळविण्यात येत आहे. नोंद घ्यावी. *बँकेच्या संचालक मंडळाने ग्राहकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये*

Post a comment

0 Comments