पुणे. दफन टेंडर रद्द करा.


 दफन टेंडर रद्द करा.

मेलेल्या माणसाच्या टाळुवरचे लोणी खाणाऱ्य ‍या टेंडर पद्धतीचा जाहीर निषेध 

PRESS MEDIA LIVE :  पुणे :

 पुण्यात कोरोना या महामारी पसरल्यानंतर विविध समस्या पुणे महानगरपालिका समोर उभ्या राहिल्या.प्रथम पुण्यात कोरोना या आजाराने एक व्यक्तीचा निधन झाले. अंतिम संस्कार करण्यासाठी पुणे महानगरपालिका कर्मचारीही घाबरत होते त्या वेळी तत्कालीन आयुक्त मा चंद्रशेखर गायकवाड यांनी पुण्यातील सामाजिक संस्थांना आव्हान केले की कोरोना या महामारीचे आजार व त्यातुन निर्माण झालेल्या समस्या व पुण्यातील लोकांमध्ये असलेली भीती कर्मचाऱ्यांमध्ये असलेली भीती या सर्वांविषयी काम करण्यासाठी जनतेने व सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढे येणे गरजेचे आहे. नुकताच या आजाराने मृत व्यक्तीचा अंतिम संस्कार करण्यासाठी महापालिका कर्मचारी यांच्या मनात ही भीती होती. म्हणून आम्ही विनंती करतो की सामाजिक संघटनांनी या कामात आमची मदत करावी.

 त्यांनी केलेल्या आवाहनानंतर सर्वात प्रथम पुणे शहरात मूलनिवासी मुस्लीम मंच या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तत्कालीन आयुक्त मा.शेखर गायकवाड व आरोग्य अधिकारी मा.राम हंकारे साहेब, सहआरोग्य अधिकारी कल्पना बळीवंत यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सांगितले की आम्ही तुमच्या मदतीला तयार आहोत.  covid-19 आजाराने मरणार्‍या व्यक्तींचा अंतिम संस्कार करण्यासाठी आमची संस्था तुम्हाला मदत करीत आहोत. आमच्या संस्थेने स्पष्टपणे लेखी स्वरूपात असे पत्र दिले की या सर्व कामांचा कोणताच मोबदला किंवा मानधन आमची संस्था घेणार नाही हे सर्व काम आम्ही जनतेचे भले साठी पुणे महानगरपालिकाच्या कर्मचाऱ्यांच्या मनात असलेली भीती दूर करण्यासाठी करीत आहोत व सामाजिक सलोखा निर्माण व्हावा लोकांच्या मनातील भीती दूर व्हावी याकरिता आमची संस्था महानगरपालिकेच्या मदतीला आली आहे .

कोरोना या महामारीच्या काळात अत्यंत भीतीचा वातावरण असताना पुणे या शहरात कडक लॉकडॉन असताना शहरातील सर्व हॉटेल्स दुकान चहापाणी टपरी बंद असताना या आजाराने मरण पावलेल्या  व्यक्तीचे काही नातेवाईक सुद्धा जवळ येत नसताना अशा गंभीर परिस्थितीत संतांची व महापुरुषांची विचारधारा डोळ्यासमोर ठेवून आमची संस्था गेल्या पाच महिने  रात्रंदिवस महापालिकेच्या कामात मदत करीत आहे. व आजरोजी पर्यंत  मरणार्‍या साधारणता साडेतीनशे पेक्षा जास्त लोकांचा अंतिम संस्कार संघटनेच्यावतीने करण्यात आले आहे. त्यात मुस्लिम, ख्रिश्चन,लिंगायत,तेलगू अन्य असे अनेक समाज बांधवांचा त्या-त्या धर्मानुसार दहनविधी व दफनविधी करण्यात आले.

 नुकताच पेपर मध्ये आलेल्या जाहिरात नूसार पुणे महानगरपालिकेने सदर काम करण्यासाठी दफन टेंडर पद्धत चालू केली आहे. मोफत मध्ये सेवा देणाऱ्या संस्थांनी कुणीच मागणी केली नाही. महाभयंकर धोका पत्करून काम करणाऱ्या निस्वार्थी कार्यकर्त्यांना विमा योजना द्यावी किंवा काम करत मरण पावल्यास नुकसान भरपाई द्यावी कुटुंबाच्या लोकांना महापालिकेत नोकरी द्यावी अन्य अशी कोणतीच मागणी न करता सेवाभावी वृत्तीने संस्थेने महापालिकेला मदत केली हे सर्व काम करताना आमच्या कार्यकर्त्यांच्या डोळ्यासमोर पुण्य कमविणे सवाब कमविणे माणुसकीचे नाते जपणे असे खुले विचार घेऊन आम्ही काम करत होतो. हे काम करताना फक्त परिवाराचे लोकांचीच आम्हाला मदत होती आमचे जवळचे असलेले मित्र आम्हाला पाहिल्यानंतर आमच्याशी बोलत नव्हते जवळ येत नव्हते आमचे कार्यकर्ते स्वतःचे खिशातील पैसे लावून सुरुवातीपासून तर आज रोजी पर्यंत हे काम आम्ही करत होतो व आहे व पुढेही करण्याची इच्छा आम्ही व्यक्त करतो.

    

        मात्र अशा पद्धतीचा टेंडर काढून पुणे महानगरपालिकेने सेवाभावी वृत्तीने पुण्य सवाब, माणुसकीचे नाते जपण्याचा काम करणाऱ्या संस्थांनी किंवा सामाजिक काम करणाऱ्या कार्यकर्ते संपले पाहिजे असे कामच करू नये माणुसकी जपू नये प्रत्येक कामात आर्थिक सौदेबाजी झालीच पाहिजे मग जरी माणूस मेला तरी काम करताना पैसे घेऊनच काम करावा असा नीच विचार घेऊन पुणे महानगरपालिकेने हे टेंडर काळल्याची टीका आम्ही करीत आहोत.

        गेल्या तीन महिन्यापासून काही सामाजिक कार्यकर्त्यांचे व संघटनाचे covid-19 या आजाराने मरणार्‍या व्यक्तींचा अंतिम संस्कार करण्याचे मोफत सेवा देणार्‍या अर्ज पेंटिंग असताना अचानकपणे असा टेंडर का काढण्यात आला याचा खुलासा होणे खूप गरजेचे आहे. किंवा याबाबत पालिका प्रशासनाने कुणाची लाच घेतली आहे का खुलासा होणे गरजेचे आहे.

 दफन टेंडर पद्धत रद्द करा या मागणीसाठी आज रोजी 21/8/200 रोजी पुणे महानगरपालिका मुख्य द्वार समोर मूलनिवासी मुस्लिम मंचाचे अध्यक्ष अंजुम इनामदार व ख्रिश्चन चारीटेबल ट्रस्ट अध्यक्ष सगई नायर यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलने करण्यात आली.

याप्रसंगी.,......,.......,...... उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post