कुडाळ: आता कुडाळ येथे मिळणार विस मिनिटांमध्ये कोरोनाचा अहवाल

आता कुडाळ येथे मिळणार 20 मिनिटांमध्ये कोरोनाचा अहवाल.

आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते झाले कोविड रॅपिड टेस्ट सेंटर उद्घाटन..

PRESS MEDIA LIVE : ( कुडाळ प्रतिनिधी ) :

कुडाळ प्रतिनिधी - कुडाळ येथे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते कोविड 19  या रॅपिड टेस्ट सेंटरचे आज उद्घाटन करण्यात आले.कुडाळ तालुक्यातील कोरोना रुग्ण संख्या लक्षात घेता.तसेच कुडाळ मधील नागरिकांना कोविड टेस्ट साठी दूरवर जावे लागू नये यासाठी कुडाळ तालुक्यात येत्या दोन दिवसात रॅपिड अँटीजेन टेस्ट सेंटर आज सुरू करण्यात आले आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कुडाळ येथील विश्रामगृहामध्ये अँटीजेन टेस्ट किटद्वारे कोविड टेस्ट केली जाणार आहे.अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे.

          सध्या कोरोनाचा होणार फैलाव पाहता कोविड 19 रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची, तसेच मुंबई व इतर भागातून आलेल्या व्यक्तींना कोरोनाची लक्षणे आढळत असल्यास त्यांची रॅपिड कोविड टेस्ट या अँटीजेन टेस्ट किट द्वारे केली जाणार आहे.20 मिनिटांमध्ये त्याचा रिपोर्ट  मिळणार आहे.कुडाळ तालुक्यातील लक्षणे आढळणाऱ्या नागरिकांची  कोविड  टेस्ट जलद करून मिळावी त्यांना दूरवर टेस्ट साठी जावे लागू नये याकरीता रॅपिड टेस्ट सेंटर सुर केले आहे.असे आमदार वैभव नाईक यांनी सांगितले.

        यावेळी आमदार वैभव नाईक सोबत शिवसेना तालुकाप्रमुख राजन नाईक विकास कुडाळकर,जयभारत पालव,डॉ.नलावडे,डॉ.गौरव घूर्ये,संजय भोगटे ,अतुल बंगे ,वर्षी कुडाळकर, श्रेया परब,नगरसेवक सचिन काळप,सुशिल चिंदरकर,मंदार शिरसाठ, संतोष शिरसाठ,राजू गवंडे, बबन बोभाटे,नागेश आईर,राजू जांभेकर, गंगाराम सडवेलकर,संदीप म्ह|डेशोर,कृष्णा तेली,सागर नानोस्कर,अमरसेंन सावंत,जीवन बांदेकर, प्रज्ञा राणे,सुयोग्य धवन,एम .बी.गावडे,नितीन सवांत,आनंद मार्गज उपस्थित होते.

Post a comment

0 Comments