सांगली जिल्हा परिषद:


सांगली जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जागेवर व्यापारी संकुल  उभारण्यासाठीचा प्रस्ताव.



PRESS MEDIA LIVE : सांगली :

जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जलस्वराज्य विभागाच्या जागेवर व्यापारी उभारण्यासाठीचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे आणण्याचा निर्णय आज बांधकाम समितीच्या बैठकीत झाला. या प्रस्तावाला मूर्त स्वरुप कसे देता येईल, याबाबत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांनी मार्गदर्शन केले. बांधकाम सभापती जगन्नाथ माळी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.  जिल्हा परिषदेचे उत्पन्न वाढवण्यासाठी मोक्‍याच्या जागा विकसीत करण्याचा प्रस्ताव आहे. त्यातील जलस्वराज्यच्या जागेबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली. ही एकूण 30 हजार चौरस फुटाची जागा आहे. तेथे व्यापारी संकुल उभारण्याचा प्रस्ताव आधी स्थायी समितीसमोर आणि तेथून सर्वसाधारण सभेपुढे नेला जाईल, असे जिल्हा परिषदेच्या मालकीच्या विश्रामधाम आणि अधिकारी निवासस्थानातील कंत्राटी पहारेकरी, खानसामा यांच्या निविदेस पुढील कार्यारंभ आदेशापर्यंत मुदतवाढीचा निर्णय झाला.

सन 2000 ते 2015 या काळात कंत्राटदारांचे चलनाने भरलेल्या तसेच देयकातून कपात केलेल्या अनामत रकमा 13 कोटींच्या आहेत. त्या परत मिळण्याकरता अर्जासाठी एक महिन्यांची मुदत देण्यात आली. महापूर पार्श्‍वभूमीवर यांत्रिक बोटी खरेदीचा आढावा घेण्यात आला. 15 व्या वित्त आयोगाच्या 4 कोटी 80 लाख रुपयांच्या रकमेचे सदस्यांना समान वाटप व्हावे, अशी मागणी सदस्य अरुण राजमाने यांनी केली. ती मान्य करत तशा सूचना देण्यात आल्या. जनसुविधा व नागरी सुविधा योजनेतून हायमास्टचे काम प्रलंबित असल्याबाबत अरुण बालटे यांनी नाराजी व्यक्त केली.


Post a Comment

Previous Post Next Post