सांगली : पुन्हा लॉक डाऊन.

सांगली जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन ची घोषणा.

 पालक मंत्री जयंत पाटील.


PRESS MEDIA LIVE :   सांगली  : 

सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली पार पडलेल्या बैठकीत सांगली जिल्ह्यात पुन्हा एकदा लॉकडाऊ न ची घोषणा करण्यात आली आहे. ग्रामपंचायत वगळता पूर्ण सांगली जिल्ह्यात पुन्हा लॉकडाउनची घोषणा करण्यात आल्यामुळे 30 जुलैपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार राहणार बंद राहणार आहेत.

बुधवार 22 जुलै रात्री 10 वाजल्यापासून गुरुवार 30 जुलै रात्री 10 वाजेपर्यंत सांगलीतील लॉकडाऊनचा कालावधी असेल. पालकमंत्री जयंत पाटील यांनी हा निर्णय सांगली जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असल्याने घेतला. तत्पूर्वी काही दिवसांपूर्वीच जयंत पाटील यांनी सांगलीतील गर्दी कमी न झाल्यास लॉकडाऊन करणार, असा सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री जयंत पाटील, मंत्री विश्वजीत कदम, विद्यमान आमदार, खासदार आणि अधिकारी यांच्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

Post a comment

0 Comments