सांगली :

सांगलीत पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात काँग्रेसचे आंदोलन.


PRESS MEDIA LIVE :.  सांगली.

सांगली कॉंग्रेस भवन येथे सांगली शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली व आमदार विक्रम सावंत, श्रीमती जयश्रीताई पाटील व श्रीमती शैलजा भाभी पाटील यांच्या उपस्थितीत केंद्रातील हुकुमशाही मोदी सरकार विरुद्ध अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटी च्या सूचनेनुसार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या मार्गदर्शनाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी मोठी स्क्रीन लाऊन केंद्रातील सत्ता येण्या अगोदर बीजेपी नेत्यांनी आता पर्यंत जे जे पेट्रोल दरवाढी बदल बोलले होते व आता ते कसे बदलत आहेत हे त्याच्या व्हिडिओ चित्रीकरण द्वारे जनतेला दाखवून भांडा फोड करण्यात आला. या मुळे केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार ७ जूनपासून दररोज पेट्रोल-डिझेलमध्ये दरवाढ करत सामान्य जनतेला लुटत आहे. देश कोरोना सारख्या गंभीर संकटाचा सामना करत असताना मोदी सरकार मात्र अन्यायी पेट्रोल व डिझेल दरवाढ करुन  सर्व सामान्य जनतेची लूट करत आहे हे उघड झाले आहे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटी ने हे वेगळे आंदोलन केल्यामुळे सर्वाचे लक्ष वेधून घेतले. 
या वेळी पृथ्वीराज पाटील म्हणाले आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती प्रचंड कमी असतानाही मोदी सरकार त्याचा लाभ सामान्य जनतेला देत नाही. कोरोनामुळे लोकांचे रोजगार गेले आहेत, उद्योग-व्यवसाय अजून पूर्वपदावर आलेले नाहीत, त्यात ही भाववाढ सामान्य जनतेवर अन्याय करणारी आहे. दररोजच्या थोडी थोडी भाववाढीमुळे पेट्रोल प्रति लिटर ९.१२ रुपये तर डिझेल ११.०१ रुपयांनी वाढले आहे त्यामुळे एक लिटर पेट्रोलला ८७-८८ रुपये मोजावे लागत आहेत. काही राज्यांमध्ये डिझेल पेट्रोलपेक्षा जास्त महाग झाले आहे. ही भाववाढ अशीच राहिली तर पेट्रोल व डिझेल १०० रुपये लिटर होण्यास जास्त अवधी लागणार नाही. या परिस्थितीत केंद्रातील हुकुमशाही मोदी सरकार जनतेला वेठीस धरत आहेत म्हणुन कॉंग्रेस पक्षाच्या वतीने आज सर्व ठिकाणी धरणे आंदोलन करून इंधन दरवाढ मागे घेण्याची मागणी केली जात आहे. आंदोलना नंतर भारताचे राष्ट्रपती महामहिम मा.रामनाथ कोव्हीद यांना मा.जिल्हाधिकारी सांगली यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले आहे.  
डॉ. मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखालील युपीए सरकारच्या काळात आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या किमती १६४ डॉलर प्रति बॅरलपर्यंत वाढल्या असतानाही त्याचा बोजा सामान्यांवर पडणार नाही याची काळजी घेत इंधनाचे दर स्थिर ठेवले होते. २०१४ मध्ये पेट्रोलवर उत्पादन शुल्क हे ९.४० रुपये तर डिझेलवर ३.५६ रुपये होते. केंद्रातील भाजप सरकारने हेच शुल्क पेट्रोल ३२.९८ रुपये तर डिझेल ३१.८३ रुपये पर्यंत वाढवले आहेत. त्यामुळे इंधन दरवाढ करुन सुरु असलेली नफेखोरी बंद करावी, व भाववाढ तात्काळ मागे घेऊन सर्वसामान्यांना न्याय द्यावा. या मध्ये सर्व सामान्य जनतेला सहभागी करून घेत कॉंग्रेस #SpeakuponPetroleumPrices ही ऑनलाईन मोहिमही सोशल मीडियावर चालवत आहे, जनतेने या माहिमेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आले.
यावेळी नामदेवराव मोहिते, बाळासाहेब पाटील, बाळासो गुरव, राजेंद्र शिंदे, आर आर पाटील, माणिक भोसले, अवीराजे शिंदे, आप्पासो शिंदे, विरोधी पक्ष नेते उत्तम साखळकर, नगरसेवक मंगेश चव्हाण, संतोष पाटील, फिरोज पठाण, मनोज सरगर, नगरसेविका वहिदा नाईकवाडी, शुभांगी साळुंखे, मदीना बारुदवाले, अमर निंबाळकर, रवींद्र वळीवडे, बिपिन कदम, शेवंताताई वाघमारे, अल्ताफभाई पेंढारी, सनी धोत्रे, सौरभ पाटील, इरफान मुल्ला, विजय जाधव, योगेश राणे, आयुब निशाणदार, आशिष चौधरी, प्रशांत चव्हाण, चंद्रकांत आंबी, मौला व्हटमूरे, धनराज सातपुते, डॉ.राजेंद्र मेथे, डॉ. प्रताप भोसले, कयूम पटवेगार, अशोकसिंग राजपूत, संतोष भोसले, इलाही बारुदवाले, रफिक मुजावर, अरुण पळसुले, माणिक कोलप, राजेंद्र कांबळे, याकुब मनेर, वृषाली वाघचोरे, ताजुद्दीन तांबोळी, सकलेन मुजावर, अजित दोरकर, विलास बेले, श्रीनाथ देवकर, सौरभ साळुंखे, प्रमोद सूर्यवंशी, अमित पारेकर, अँड.भाऊसाहेब पवार, राजेंद्र कांबळे, अर्जुन कांबळे, आकाश शेंडे, सद्दाम कलावंत, अकबरभाई मोमिन, शुभम बनसोडे, डी पी बनसोडे, प्रशांत आयवळे, जावेद मुल्ला, अमीर इनामदार, चैतन्य पाटील, सोहेल बलदंड, समीर मुजावर, विजय आवळे, सुभाष पट्टणशेट्टी, शैलेंद्र पिराळे, नामदेव चव्हाण, विक्रम वाघमोडे, विठ्ठल काळे, मंदार सूर्यवंशी, रोहित कोळेकर, रमेश जाधव, उदयसिंह शिंदे, रामचंद्र चव्हाण, सचिन चव्हाण, अरबाज शेख, कॉंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post