इचलकरंजी :

इतर संघटनांनी याचे अनुकरण करावे. खासदार धैर्यशील माने.



इचलकरंजीतील वृत्तपत्र विक्रेता संघटना यांच्या वतीने आय.जी.एम.ला देण्यात आलेल्या स्ट्रेचर व व्हीलचेरचा लोकार्पण सोहळा संपन्न.

PRESS MEDIA LIVE :      इचलकरंजी  ( प्रतिनिधी ) 

कोरोना  महामारीच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी शहरातील वृत्तपत्र विक्रेत्यांनी आयजीएम रुग्णालयात स्ट्रेचर व व्हीलचेअर देऊन समाजापुढे एक वेगळा आदर्श ठेवला असुन समाजातील इतर संघटनांनी याचे अनुकरण करावे असे खासदार धैर्यशील दादा यांनी सांगीतले व सर्व वृत्तपत्र विक्रेते व संघटनेचे पदाधिकारी यांचे आभार मानून अभिनंदन केले.

यावेळी आमदार मा.प्रकाश आवाडे, माजी आमदार मा. सुरेश हळवणकर, इचलकरंजीच्या नगराध्यक्षा सौ.अलका स्वामी, प्रांताधिकारी डॉ.विकास खरात, उपनगराध्यक्ष मा.तानाजी पोवार, इचलकरंजी नगरपालिकेचे मुख्याधिकारी मा.संतोष खांडेकर, पोलीस उपाधीक्षक मा.गणेश बिरादार, इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.रवी शेट्ये, शिवसेना उपजिल्हाप्रमुख मा.महादेव गौड, नगरसेवक मा.रवींद्र माने, मा.भाऊसाहेब आवळे, शिवसेना शहरप्रमुख मा.सयाजी चव्हाण, मा.धनाजी मोरे, मा.मलकारी लवटे,राजुदादा आरगे,बसय्या स्वामी,संतोष चव्हाण पुरोगामी वृत्तपत्र संघटनेचे अध्यक्ष कॉ.शिवगोंडा खोत सचिव मा.आण्णा गुंडे, संघटनेचे पदाधिकारी, वृत्तपत्र विक्रेते व मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post