विधानसभेची निवडणूक होते, मग महापालिकेची का नाही..? .मनसे नेते वसंत मोरे



प्रेस मीडिया लाईव्ह : 

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या शनिवारी कसबा आणि चिंचवडबाबत आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचं सांगितलं जात आहे. राज ठाकरे या दोन्ही पोटनिवडणुकीत भाजपला पाठिंबा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, त्यापूर्वीच मनसेचे नेते वसंत मोरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या पोटनिवडणुकीवरून सवाल केले आहेत. विधानसभेची निवडणूक होते, मग महापालिकेची का नाही..? असा सवाल वसंत मोरे यांनी केला आहे.


मोरे यांच्या रोख ठोक सवाला मुळे भाजपचं टेन्शन वाढलं असून राज ठाकरे यांचीही कोंडी झाल्याचं सांगितलं जात आहे.मनसे नेते वसंत मोरे यांनी फेसबुकपोस्टमधून हा सवाल केला आहे. माझा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारला एक प्रश्न विचारत आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील भाजपाचे दोन आमदार नुकतेच मयत झाले. अजून त्यांच्या सरणाची राख निवली सुद्धा नसेल, तुम्ही तुमची मते कमी होतील म्हणून लगेच त्या त्या ठिकाणी निवडणुका घेतल्या. मग मागील एक वर्षापासून आमच्या शहराला कोणताही लोकप्रतिनिधी (नगरसेवक) नाही प्रशासनाने शहराचे वाटोळे लावले आहे. विकास कामे ठप्प झाली आहेत. निधी नसल्यामळे नागरिकांना थोबाड दाखवू वाटत नाही. मग तुम्ही पालिका निवडणुका का घेत नाही? असा प्रश्न वसंत मोरे यांनी केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post