सेवा आरोग्य फाऊंडेशनच्या वतीने कोथरूड भागातील ५०० मुलींनी ५० हजाराच्या वर सूर्यनमस्कार पूर्ण केले

पुढील वर्षी एक दशलक्ष सुर्यनमस्काराचे उद्धिष्ट ठेवावे........डॉ आनंद गोडसे


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : ( प्रतिनिधी ) : 

सेवा आरोग्य फाऊंडेशन व समग्र हेल्थ केअर सेन्टर यांच्या सहकार्याने  कोथरूड,वारजे,कर्वेनगर,शिवणे उत्तमनगर,एरंडवणे भागातील सेवा वस्तीतील पाचशे मुलींतर्फे मकरसंक्रांत ते रथसप्तमी या दरम्यान सूर्यनमस्कार यज्ञ कार्यक्रम घेण्यात आला. १ ते ८ जाने श्रीया च्या कार्यकर्त्यांनी वस्तीत जाऊन सुरवातीला त्यांना सुर्यनमस्काराचे   प्रशिक्षण देण्यात आले होते.१५ ते २८ जानेवारी दरम्यान सगळ्यांनी घरी सूर्यनमस्कार घालून त्याची कार्ड वर नोंदणी केली होती.



रविवारी सकाळी ८ ते १० या वेळेत कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या क्रीडा मैदानावर हा सूर्यनमस्कार यज्ञ घेण्यात आला.या सांगता समारोह कार्यक्रम प्रसंगी सेवा आरोग्य फाऊंडेशनचे संचालक प्रदीप कुंटे,सेन्साटा टेक्नॉलॉजीज च्या अपर्णा दिवेकर,सविता कजरेकर,श्रीया समर्थ हेल्थ टेक्नॉलॉजी च्या योजनगंधा मराठे,डॉ आनंद गोडसे,अमित कुलकर्णी,डॉ हर्शदा पाध्ये यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

प्रमुख पाहुणे डॉ आनंद गोडसे म्हणाले,"रथसप्तमी च्या निमित्ताने सुर्यदेवतेचे पूजन म्हणून पन्नास हजार च्यावर या सेवा वस्तीतील मुलींकडून सूर्यनमस्कार सुर्यदेवतेने घालून घेतले.आपली शक्ती व साधनेच्या मार्फत बळ मिळावे.आरोग्यासाठी योग,व्यायाम व सुर्यनमस्काराचे महत्व सांगितले.यावर्षी ५० हजार सुर्यनमस्काराचे उद्दिष्ट असले तरी पुढील वर्षी एक दश लक्ष सुर्यनमस्काराची आहुतीचा संकल्प करावा"असे आवाहन डॉ आनंद गोडसे यांनी यावेळी केले.सुर्यपूजा म्हणजे दररोज नियमित व्यायाम.प्रत्येकाने आवश्यक तेवढेच जेवण करावे,आवश्यक तेवढेच झोपणे असावे,आवश्यक तेवढेच बोलावे हे सूर्यनमस्कार प्रशिक्षणाच्या वेळेसचे सोडून असल्याचे  समजल्यावर त्यांनी सेवा आरोग्य फाऊंडेशनने सेवा वस्तीतील मुलींच्या या मकरसंक्रांत ते रथसप्तमी च्या कालावधीतील घेतलेला हा उपक्रम प्रेरणादायी असल्याचे सांगितले. 


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती जोशी ह्यांनी केले.डॉ हर्षदा पाध्ये यांनी प्रास्ताविक केले. सेवा आरोग्य फाउंडेशन मागील सात वर्षापासून वारजे, कर्वेनगर, कोथरूड,शिवणे,उत्तमनगर,एरंडवणे या भागातील वस्त्यांमध्ये काम करत आहे.सध्या संस्थेच्या आरोग्यवर्धन प्रकल्पमार्फत १८ साप्ताहिक दवाखाने,४ फिजिओ थेरपी,व दोन नेत्र तपासणी दवाखाने सुरू आहेत.घे -भरारी या किशोर विकास प्रकल्पाचे १५ वर्ग सुरू आहेत व समृद्धी प्रकल्पाच्या १७ वर्गातून ३ ते १२ वयोगटातील मुलामुलींना संस्कार देण्याचे काम सुरू असल्याचे डॉ हर्षदा पाध्ये यांनी सांगितले.

प्रातिनिधिक स्वरूपात मुलींना पाहुण्यांचा हस्ते प्रशस्ती- प्रमाणपत्र देण्यात आली.


कार्यक्रमात वस्तीतील घरेलू महिला कामगारांनी आपल्या कामावर सुट्टी घेऊन सूर्यनमस्कार मध्ये सहभाग नोंदविला हे विशेष.


कार्यक्रमास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कर्वेनगर चे कार्यवाह चेतन भिसे,यशवंत हर्षे, संचालक मनोज देशमुख,सु ल जोशी, केशव माधव निधी चे प्रकाश देशपांडे, यांची उपस्थिती होती.


उपस्थित मुलींना नाश्ता व थंड पेय देण्यात आले.


हा अभिनव कार्यक्रम बघण्यासाठी कर्वेनगर कोथरूड,वारजे,शिवणे,एरंडवणे भागातील नागरिकांनी गर्दी केली होती.


फोटो-

१) कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या क्रीडा मैदानावर रथसप्तमी निमित्त आयोजित मुलींच्या सूर्यनमस्कार सांगता समारोह कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे डॉ आनंद गोडसे बोलतांना

२) मुली  सूर्यनमस्कार घालतांना

३) योग शिक्षक व मार्गदर्शक

Post a Comment

Previous Post Next Post