पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्व जागा आम आदमी पार्टी लढणार ...राज्य उपाध्यक्ष माजी खासदार हरिभाऊ राठोड



प्रेस मीडिया लाईव्ह :

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्व जागा लढणार असल्याची घोषणा आम आदमी पार्टीचे राज्य उपाध्यक्ष माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी सोमवारी (दि. 9) पिंपरी-चिंचवड येथील पत्रकार परिषदेत केली.

माजी खासदार हरिभाऊ राठोड यांची पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक प्रभारी पदी नेमणूक करण्यात आल्यानंतर राठोड यांनी शहराचा पहिला दौरा केला. या वेळी शहरातील कार्यकर्त्यांबरोबर निवडणुकी संदर्भात चर्चा केली. तसेच आपची पुढील वाटचालीविषयी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. या वेळी बोलताना राठोड म्हणाले की, पिंपरी चिंचवड महापालिकेला भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या जाचातून मुक्त करण्यासाठी आम आदमी पार्टी आगामी निवडणुका लढणार आहे. दिल्ली आणि पंजाब प्रमाणे सामान्य नागरिकांच्या पाठिंब्यावर पिंपरी चिंचवडमध्ये सत्ता हस्तगत करू. कारण भल्या भल्या प्रस्थापितांना धूळ चारण्याची किमया ही सर्वसामान्य नागरिकांनी निवडणूक हातात घेतल्यानंतर होत असते.
मतदारांचा विश्वासघात करणाऱ्या आयाराम गायाराम संस्कृतीला आप थारा देणार नाही. श्रमिक नगरीमधील हक्काच्या घराचे सर्व योजनांमधील घरकुलांचा प्रश्न मार्गी लावण्यास वचनबद्ध आहोत.
या वेळी राज्य प्रवक्‍ते मुकुंद कीर्दत, पिंपरी चिंचवड कार्यकारी अध्यक्ष चेतन बेंद्रे, शहराध्यक्ष अनुप शर्मा उपस्थित होते.

संविधानाची अंमलबजावणी हाच आमचा जाहीरनामा
भारतीय संविधानाची अंमलबजावणी करणे हाच आमचा जाहीरनामा असणार आहे. त्यादृष्टीने कल्याणकारी राज्याची संकल्पना राबवून मोफत दर्जेदार शिक्षण, उत्कृष्ट आरोग्य सुविधा, विद्यार्थी आणि महिला यांना मोफत बस प्रवास ही आमच्या विजन डॉक्‍युमेंट असणार आहे. त्याचप्रमाणे आतापर्यंतच्या सर्व प्रकल्पांचे महालेखापाल कॅगमार्फत चौकशी करून भ्रष्टाचारी लोकांवर कारवाई करण्याचे आश्वासन देत असल्याचे राठोड यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post