इन्स्टाग्रामवर लवकरच हे नवीन फीचर सर्व यूजर्ससाठी रिलीज करण्याच्या तयारीत



प्रेस मीडिया लाईव्ह :

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राम सर्वात लोकप्रिय अॅप्सपैकी एक आहे. इन्स्टाग्राम वेळोवेळी आपल्या यूजर्ससाठी नवनवीन अपडेट्स, फिचर्स घेऊन येतात.त्यामुळे इन्स्टाग्राम यूजर्सच्या संख्येत मोठ्या संख्येने वाढ झाली आहे. एकेकाळी फोटो शेअरिंगसाठी वापरले जाणारे हे अॅप आता छोट्या व्हिडीओसाठीही वापरले जात आहे. यूजर्सची वाढती संख्या लक्षात घेऊन कंपनी सतत आपल्या फीचर्समध्ये सुधारणा करण्यात गुंतलेली आहे. सध्या Meta च्या मालकीची ही कंपनी इन्स्टाग्रामसाठी दोन नवीन फिचर्स घेऊन येणार आहे. अनेक दिवसांपासून या फीचरची टेस्टिंग सुरु आहे. लवकरच हे फिचर्स सुरु होण्याच्या प्रतीक्षेत आहे. त्या आधी हे दोन नवीन फिचर्स नेमके कोणते आणि यामध्ये नेमकं काय खास असणार आहे हे जाणून ध्या.

1. पोस्ट शेड्यूल करता येणार

कंपनी लवकरच हे नवीन फीचर सर्व यूजर्ससाठी रिलीज करण्याच्या तयारीत आहे. या फिचरवर बरेच दिवस काम सुरू होते. सध्या बीटा व्हर्जनवर त्याची चाचणी सुरू आहे. हे फीचर सुरू केल्यानंतर, यूजर्स त्यांचा कोणताही कंटेंट कधी सार्वजनिक (Public) करायचा, म्हणजेच पोस्ट करायचा हे ठरवू शकतात. हे सेट केल्यानंतर, तुम्ही या पोस्टसाठी तारीख आणि वेळ ठरवल्यानंतर ती पोस्ट त्याच दिवशी पोस्ट केली जाईल.

Reels

याप्रमाणे वापर करू शकता

  • तुम्हाला सर्वात आधी इन्स्टाग्रामवर जावे लागेल. आता तुम्हाला पोस्ट करायची असलेला कंटेंट निवडा.
  • कंटेंट निवडल्यानंतर, सेटिंग्जवर जा.
  • आता सेटिंगमध्ये गेल्यावर तुम्हाला शेड्यूल पोस्टचा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर पुढे जा.
  • आता तुम्हाला तारीख आणि वेळ सेट करण्याचा पर्याय दिसेल. आपण तो कंटेंट पोस्ट करू इच्छित असलेली तारीख आणि वेळ अॅड करा. त्यानंतर तुम्हाला तो कंटेट सेट केलेल्या तारखेच्या दिवशी पोस्ट झालेला दिसेल.

2. नवीन वेबसाईट डिझाईन

शेड्यूल पोस्ट व्यतिरिक्त, आणखी एक नवीन बदल Instagram मध्ये येत आहे. इन्स्टाग्रामच्या वेबसाईटवरही हा बदल तुम्हाला दिसेल. कंपनीने त्याच्याशी संबंधित सर्व टेस्टिंग केल्याचे सांगण्यात येत आहे. या महिन्यातही ते रिलीज होणार असल्याची चर्चा आहे. नवीन बदलामध्ये इस्टाग्रामचे होम पेज अधिक कम्फर्टेंबल करण्यात आले आहे. याशिवाय यूजर्सचे कंटेंट आणि प्रोफाईल पेजही सुधारले आहे.


Post a Comment

Previous Post Next Post