भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात धडकणार त्या निमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस नेत्यांची सासवड, लोणावळा ते देहूरोड शहर दूचाकी भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले.. प्रेस मीडिया लाईव्ह

 अन्वरअली शेख  :

पुणे दि. 5 देहूरोड अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचे महाराष्ट्रात आयोजित करण्यात आलेल्या सासवड शिवतीर्थ येथून दूचाकी रॅलीची सुरुवात काँग्रेस कमिटीचे पुणे जिल्हाध्यक्ष तथा आमदार संजय जगताप यांच्या नेतृत्वात करण्यात आले. सासवड येथून मुंबई पुणे महामार्गाने लोणावळा नंतर देहूरोड येथे रॅलीचे समारोप करण्यात आले.

   देहूरोड येथील गुरुद्वारा मार्गे मेन बाजारपेठेतील सुभाष चौकामध्ये दुचाकी रॅली आल्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार संजय जगताप आणि देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष ,माजी नगरसेवक हाजीमलंग काशिनाथ मारीमुत्त यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी भारत जोडो याच्या समर्थनात मनोगत व्यक्त करण्यात आले व जनजागृती करत काँग्रेस पक्षाच्या विजयाच्या घोषणा देण्यात आले . त्यानंतर भाजी मंडई, वृंदावन चौक ,अबुशेठ रोड, मुंबई पुणे महामार्गाने दुचाकी रॅली देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या रुग्णालयाच्या आवारातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आल्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार्पण करण्यात आले. त्यानंतर रॅलीचे समारोप करण्यात आला.

महाराष्ट्र राज्याचे प्रदेश उपाध्यक्ष देविदास भन्साळी पुणे जिल्हा कॉंग्रेस कमिटी अध्यक्ष व आमदार मा. संजयजी जगताप साहेब , पुणे जिल्हा उपाध्यक्ष संग्राम दादा मोहोळ, पुणे जिल्हा महिला अध्यक्षा किरण काळभोर,पुणे जिल्हा अल्पसंख्यांक अध्यक्ष  मा.जमिरभाई काझी,

 पुणे जिल्हा किसान कॉंग्रेस अध्यक्ष मा. चंद्रकांत सोपाना गोरे पाटील, पृथ्वीराज पाटील,मावळ तालुका अध्यक्ष यशवंत मोहळ, लोणावळा शहराध्यक्ष प्रवीण गायकवाड , लोणावळा नगरपालिकेचे नगरसेवक कविटके. प्रांतिक सदस्य दीपक सायसर, मावळ तालुका अल्पसंख्यांक अध्यक्ष गफूर भाई शेख, उपाध्यक्ष व्यंकटेश कोळी, उपाध्यक्ष शंकर टी जयसिंग,पुणे जिल्हा महिला उपाध्यक्षा सौ. रानिताई पांडियन,युवती महिला अध्यक्षा कु. अनिता हाजीमलंग मारिमुत्तु, किसान सेल अध्यक्ष संभाजी पिंजण,चंद्रशेखर मारिमुत्तु, देहूरोड शहर अल्पसंख्याक अध्यक्ष मेहबूब गोलंदाज,सहसचिव बबन भगवान टोंम्पे,राकेश सोळंकी,युवा नेते मलिक शेख, युवा नेते आसिफ शेख रईस शेख अध्यक्ष आकाश रामनारयन, दक्षिण विभागिय अध्यक्ष व्यंकटेश वीरण, मुत्तू अम्मावसी, कुबेन्द्र मारिमुत्तु, एन एस वाय अध्यक्ष वर्धाराजन चंद्रशेखर मारीमुत्तू , राजू नारायण गोडसे,

तवमनी अम्मवशी,लक्ष्मी नाडार,सिंधू शिरसाठ, तवमनी अम्मवशी तसेच पुणे जिल्हा सर्व पदाधिकारी तसेच देहूरोड शहर सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते दुचाकी रॅलीमध्ये सहभागी झाले होते .


Post a Comment

Previous Post Next Post