हेल्मेट न देणाऱ्या वाहन वितरकांवर कारवाई ची मागणी; अपना वतन संघटना



प्रेस मीडिया लाईव्ह :

 अन्वरअली शेख : 

 पिंपरी चिंचवड  : पिंपरी ग्राहकाने दुचाकी खरेदी केल्यानंतर त्यांना हेल्मेट न देणाऱ्या शहरातील वाहन वितरकांवर कडक कारवाई करण्याची मागणी अपना वतन संघटनाचे अध्यक्ष सिद्दीकभाई शेख यांनी परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य ,उप प्रादेशिक परिवहन अधिकारी ,पिंपरी चिचंवड , पोलीस आयुक्त , पिंपरी चिचंवड यांच्याकडे केली आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, नागरिक आपल्या दैनंदिन प्रवासासाठी शासनाचे आवश्यक ते सर्व कर भरून दुचाकी खरेदी करतात .चालू वर्षात पिंपरी चिचंवड शहरात मोठ्या प्रमाणावर सर्वच कंपन्यांच्या दुचाकींची विक्री मोठ्या प्रमाणात झालेली आहे. केंद्रीय मोटार वाहन अधिनियम नुसार वाहन वितरकांनी ग्राहकाला गाडी विकताना हेल्मेट देणे बंधनकारक आहे . परंतु शहरामध्ये अनेक वितरक ग्राहकांनी हेल्मेटची मागणी केली असता हेल्मेट देत नाहीत.

 ग्राहकाकडून रक्कम घेतली जाते आणि गाडीची नोंदणी केली जाते परंतु नियमाप्रमाणे हेल्मेट दिले जात नाही. रस्त्यावर होणारे अपघात टाळण्यासाठी दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करावा यासाठी दुचाकीची विक्री करतानाच खरेदीदाराला दोन हेल्मेट देण्याचा नियम आहे. मात्र, या नियमाची अंमलबजावणी होत नसून, नागरिकांनी वारंवार मागणी करूनसुद्धा त्यांना हेल्मेट न देता  दुचाकी वाहन वितरक ग्राहकांचा विश्वासघात व फसवणूक करीत आहेत. याबाबत अपना वतन संघटनेकडे अनेक तक्रारी आलेल्या आहेत त्यानुसार संघटनेने केलेल्या पाहणीनुसार वाहन वितरकांनी शहरातील बऱ्याच जणांना हेल्मेट दिले नसल्याचे निदर्शनास आलेले आहे.

                  केंद्रीय मोटार वाहन कायदा १९८९ नियम १३८ (४) फ तसेच मा. मुंबई उच न्यायालय औरंगाबाद खंडपीठ क्रिमिनल सुमोटो पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन नंबर २ /२०२१ मधील निर्देशानुसार , तसेच जनहितयाचिका क्रमांक ०९/२०१९ मुंबई उच न्यायलायच्या नागपूर खंडपीठाच्या निर्देशानुसार कंपनीने व वितरकाने गाडी विकतानाच अनेक ग्राहकांना  २ हेल्मेट 

दिलेलेच नाहीत. त्यामुळे पिंपरी चिचंवड मधील सर्व वाहन वितरकांची याबाबात चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी .

प्रतिक्रिया :- 

रस्त्यावरील अपघातांची वाढती संख्या लक्षात घेता राज्य सरकारने २०२१ मध्ये दुचाकी खरेदी करतानाच वितरकाने हेल्मेट देण्याबाबत सूचना केलेल्या होत्या , तसेच केंद्रीय मोटार परिवहन कायद्यानुसार तसेच मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार हेल्मेट देणे बंधनकारक आहे . परंतु याची अंमलबजावणी केली जात नाही. त्यामुळे अशा वितरकांवर गुन्हे दाखल करावेत . 

 पिंपरी चिचंवड शहरामध्ये नागरिक सर्रासपणे हेल्मेटविना फिरताना आढळतात . अपघातांची संख्या रोखण्यासाठी नागरिकांनी हेल्मेट वापरले पाहिजे . हेल्मेट न मिळाल्याची  ग्राहकांची तक्रार आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येईल - पोलीस उपायुक्त आनंद भोईटे* 




  

Post a Comment

Previous Post Next Post