महापालिकेकडून यंदाही ” व्ही कलेक्‍ट मोहीम राबविण्यात येणार



प्रेस मीडिया लाईव्ह 

पुणे : दिवाळीच्या निमित्ताने केल्या जाणाऱ्या साफसफाईतून निघणाऱ्या जुन्या परंतु उपयुक्त वस्तू पर्यावरण पूरक पद्धतीने पुनःवापर आणि पुनः निर्मितीसाठी पुणेकरांना देता याव्यात यासाठी महापालिकेकडून यंदाही ” व्ही कलेक्‍ट मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी 16 ऑक्‍टोबर पर्यंत शहरातील 15 क्षेत्रीय कार्यालयांच्या स्तरावर फिरत्या वाहनांमधून हे कचरा संकलन केले जाणार असून नागरिकांनी हा कचरा महापालिकेकडे जमा करावा असे आवाहन महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आले आहे.


अनेकदा नागरिकांकडून साफ सफाईनंतर हा कचरा कचरा संकलनाची सुविधा नसल्याने रात्रीच्या वेळी तो गुपचूपपणे नदीपात्र, नाले, तसेच रस्त्याच्या कडेला टाकला जातो. तर सणांच्या कालावधीत निघणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण लक्षणीय असते. त्यामुळे, महापालिकेने यंदाही या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे. या उपक्रमात जुन्या वस्तूंचे संकलन करून त्या लॅडफिलला जाण्यापासून रोखून पुनःवापर व पुनः चक्रीकरणाकडे वळवल्या होत्या. त्यामुळे नागरिकांकडून मिळालेले जुने कपडे, पुस्तके, भांडी, इलेक्‍ट्रॉनिक उपकरणे, शोभेच्या वस्तू कचरा वेचक व इतर गरजू लोकांपर्यंत अतिशय स्वस्त दरात पोहचवण्यात मोठे यश मिळाले आहे.

दरवर्षीप्रमाणे जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या जुन्या वस्तु व ई-वेस्ट स्वच्छ व्ही कलेक्‍ट उपक्रमात देऊन कचरावेचकांसह शहराच्या पर्यावरण संवर्धनात सहभागी व्हावे- आशा राऊत ( उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग)

कचरा कोणत्या भागात कधी देऊ शकता ....

12 ऑक्‍टोबर- ढोले पाटील रोड, शिवाजीनगर घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालय,

13 ऑक्‍टोबर – वाघोली, नगर रोड, येरवडा – कळस धानोरी

14 ऑक्‍टोबर – कोथरूड- बावधन, वारजे कर्वेनगर

15 ऑक्‍टोबर – औंध-बाणेर, बिबवेवाडी, कोंढवा-येवलेवाडी, हडपसर मुंढवा

16 ऑक्‍टोबर – रोजी सिंहगडरोड, वानवडी रामटेकडी, कसबा विश्रामबागवाडा, धनकवडी सहकारनगर

या शिवाय महापालिकेच्या https://www.pmc.gov.in/mr/y-collect-drive 2022 या संकेतस्थळावर या केंद्राची यादी नागरिकांना पाहता येणार आहे.




Post a Comment

Previous Post Next Post