नेहरू भवन ड्रेनेजलाईनची व रोडची समस्याला घेऊन- गब्बर एक्शन कमिटीचे निवेदन.


प्रेस मीडिया लाईव्ह :

 औरंगाबाद (अब्दुल कय्यूम  ) :

 नेहरू भवन समोर ड्रेनेजलाईनची समस्या तसेच नेहरू भवन बुड्डीलैन, औरंगपुरा रस्ताची दुरवस्था बाबत  गब्बर एक्शन कमिटी तर्फे मनपा आयुक्त डॉ अभिजित चौधरी यांना समस्याला घेऊन  निवेदन देण्यात आले आहे. नेहरूभवन समोर सतत ड्रेनेज चेंबर चोकअप असल्याबाबत तसेच रस्ता दुरुस्ती  नेहरुभवन लगत ड्रेनेज लाईन वारंवार चोकअप होत असुन घाण पाणी जामा मस्जिदच्या मेनगेट समोर तुंबते त्यामुळे नमाजी लोकांना व ये जाणान्यांना याचा फार त्रास सहन करावा लागत आहे. 

जामा मस्जिद ही  ऐतिहासिक मस्जिद असुन या मस्जिदेत दररोज हजारोंच्या संख्येने नमाज अदा करणेसाठी नागरीक येतात. हा त्रास अंदाजे एक ते दिड वर्षा पासुन आहे. परंतु मनपा या कडे लक्ष देत नाही. हाकेच्या अंतरावर मनपाचे मुख्य कार्यालय असुन ही मनपाच्या अधिकारी याकडे दर्लक्ष करीत असून ही बाब अत्यंत गंभीर  आहे. तसेच जामा मस्जिद ते औरंगपुरा भाजी मंडी पर्यंत रस्ता अत्यंत खराब झालेला आहे. जागोजागी मोठे मोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांना व नागरीकांना या स्त्यात येणे जाणे कठीण झाले आहे. दररोज खड्डड्यांमुळे या रस्त्यावर किरकोळ आणि मोठे अपघात होत आहे.

करीता वरील दोन्ही समस्यांचा निपटारा 15 दिवसात करण्यात यावा अन्यथा गब्बर अॅक्शन कमीटी मनपा मुख्य कार्यालय  समोर अमरण उपोषण करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

यावेळी गब्बर ॲक्शन कमिटीचे अध्यक्ष मकसूद अन्सारी,उपाध्यक्ष हफिज अली, युवानेते सय्यद शाहरूख,शेख मोबीन, साजीद खान आदींची उपस्थिती होती,

Post a Comment

Previous Post Next Post