रजिष्टर न्युज पेपर असोसिएशनचे कार्यालय छोट्या मोठ्या वर्तमान पत्रांना उर्जा देणारे स्पुर्तीस्थान- समाजरत्न नितीनभाऊ बडेकरप्रेस मीडिया लाईव्ह :

सांगली येथे रजिष्टर न्युज पेपर असोसिएशनच्या कार्यालयाचे उदघाटन माजी मंत्री कासेगावचे सुपुत्र आमदार मा.जयंतरावजी पाटील यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात झाले. यावेळी पत्रकारांचे गुरू गुरूवर्य डाॅ.प्रा.सागर बोराडे सर कार्यक्रमास उपस्तीथ होते.

या कार्यक्रमाचे आयोजन असोसिएशनचे सचिव ,प्रगत हिंदूस्थानचे संपादक मा.दिपक ढवळे यांनी केले होते.आज डिप्लोमा ग्रॅज्युएट जर्नालीस्ट स्टुडंट असोसिएशनचे संस्थापक संपादक समाजरत्न नितीनभाऊ बडेकर यांनी या असोसिएशनच्या कार्यालयाला सांगली येथे भेट देवून असोसिएशच्या नविन कार्यालयाला शुभेच्छा देवून असोसिएशनचे सचिव प्रगत हिंदूस्थांचे संपादक दिपक ढवळे यांच्या कार्याचे कौतुक केले. त्यावेळी ते म्हणाले रजिष्टर न्युज पेपर असोसिएशनचे नुतन प्रधान कार्यालय छोट्या मोठ्या वर्तमान पत्रांना ऊर्जा देणारे स्पुर्तीस्थान ठरेल.

 आजच्या स्पर्ध्यांच्या काळात छोट्यामोठ्या वर्तमानपत्र चालकांनी संघटीत होऊन स्वतांच्या न्याय हक्कासाठी लढा उभा केला पाहीजे. आणी या व्यवसायातील अडअडचणी समजावून घेवून, एक दिलाने समाजहितासाठी काम केले पाहीजे,यासाठी संघटन कौशल्य असल्याने ज्ञान असणारे संपादक असोसिएशनचे सचिव दिपक ढेवळे यांनी सर्वाना एकत्र करण्याचे काम केले. हे कौतुक स्पद आणी आदर्श आहे. आपणा सोबत मी पत्रकारांच्या कोणत्याही अडचणीसाठी डिप्लोमा ग्रॅज्युएट र्जनालिस्ट असोसिएशनचा संस्थापक अध्यक्ष या नात्यांने कायम आहे.यावेळी प्रगत हिंदूस्थानचे संपादक असोसिएशनचे सचिव दिपक ढवळे यांना पुष्पगुच्छ देवून शुभेच्छा देण्यात आल्या.

Post a Comment

Previous Post Next Post