विश्रांतवाडी येथील सिद्धेश्वरनगर सहकारी सोसायटीमध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वेगवेगळ्या कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.

 



प्रेस मीडिया लाईव्ह :

डॉ. तुषार निवृत्ती निकाळजे :

विश्रांतवाडी, पुणे :- दिनांक १५  ऑगस्ट २०२२ रोजी विश्रांतवाडी येथील सिद्धेश्वरनगर सहकारी सोसायटीमध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वेगवेगळ्या कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. याप्रसंगी सकाळी प्रथमतः ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी लष्कराचे माजी लेफ्टनंट कर्नल  सतीश मलिक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. लेफ्टनंट कर्नल सतीश मलिक हे एन. डी. ए. पुणे येथून लष्कर प्रशिक्षण घेऊन भरती झालेले अधिकारी. यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रेरणा घेऊन मराठा रेजिमेंट मध्ये सहभागी होऊन लष्करात सेवा दिली. कारगिल युद्धात त्यांना एक पाय गमवावा लागला तरी देखील त्यांनी आयुष्यात हार न मानता आजपर्यंत देशा सेवा केली.

याप्रसंगी सोसायटीमध्ये सर्व नागरिक उपस्थित होते.


दुपारी ११ ते ३ या कालावधीमध्ये कोविड १९ च्या प्रतिबंधात्मक बूस्टर व्हॅक्सिनेशनचे डोस देण्यात आले.


रात्रौ आठ ते दहा या कालावधीमध्ये गाण्यांचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्याकरिता दृष्टीहीन व्यक्तींच्या गाण्यांचा कार्यक्रम आयोजित केला होता. अंध कलाकार निर्मित - ऑर्केस्ट्रा साई स्वरांजली, शिर्डी, जिल्हा- अहमदनगर येथील दृष्टिहीन संगीत कलाकारांनी देशभक्तीपर व सामाजिक प्रबोधन पर गीतांचा कार्यक्रम सादर केला.


दृष्टिहीन संगीत कलाकारांनी गाण्यांचे सादरीकरण केल्यानंतर सिद्धेश्वर नगर सोसायटीतील रहिवासी डॉ. तुषार निकाळजे यांनी लिहिलेले व प्रकाशित केलेले "अंडरस्टँडिंग द युनिव्हर्सिटी" हे ब्रेल - इंग्रजी पुस्तक भेट देण्यात आले.


या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. मिलिंद चव्हाण यांनी केले. यावेळी सोसायटीचे पदाधिकारी श्री. कृष्ण कुमार अय्यर, श्री. पी. बी. पाटील, श्री अजय मुकुंद देसाई, श्री.वेणू गोपाळ यांनी आभार प्रदर्शन केले.


शब्दांकन :- डॉ. तुषार निकाळजे.


Post a Comment

Previous Post Next Post