सर्वच निवडणुका ओबीसी आरक्षणासह घ्याव्यात : तानाजी पोवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी



प्रेस मीडिया लाईव्ह :

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर इचलकरंजीचे माजी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार व रवी रजपूते यांनी त्यांची भेट घेवून त्यांना शुभेच्छा दिल्या.यावेळी आगामी काळात होणा-या सर्वच निवडणुका ओबीसी आरक्षणासह घ्याव्यात अशी मागणी केली.याशिवाय इचलकरंजी नगरपालिकेला महापालिकेचा दर्जा प्राप्त करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांचे आभार मानले.

राज्यातील सत्तेत झालेल्या बदलानंतर नूतन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी अधिकृतरित्या मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला.याबद्दल मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील त्यांच्या कार्यालयात माजी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार,रवी रजपुते यांनी त्यांची भेट घेत पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी तानाजी पोवार यांनी महानगरपालिका व नगरपालिकांमधील प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेला अनुकम्पा तत्त्वावरील वारसाहकाने नियुक्तीचा प्रश्न तातडीने मार्गी लावून कर्मचाऱ्यांना त्यांचा हक्क मिळवून द्यावा ,अशी मागणी केली.यावर त्यांनी यासंदर्भात सविस्तर चर्चा करुन सकारात्मक निर्णय घेण्याचा निश्चित प्रयत्न करु,अशी त्यांना ग्वाही दिली.

Post a Comment

Previous Post Next Post