क्राईम : आपापसातील वादातून युवकाचा खून, आरोपीस अटकप्रेस मीडिया लाईव्ह

रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील

 कर्जत शहरातील डेक्कन जिमखाना भागातील एका इमारतीमध्ये चोवीस वर्षीय युवकाचा चाकूने भोसकून आणि रॉडच्या साहाय्याने मारहाण करून निर्घृणपणे खून करण्यात आला. हा खून आपापसातील वादातून झाला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. या घटनेने रेल्वे पट्ट्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

या घटने बाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसीर, तालुक्यातील रेल्वे पट्ट्यातील वांजळे गावात राहणारा समीर महेंद्र ठाकरे (२४ वर्ष) आणि पुलाची वाडी येथे राहणारा चेतन संभाजी भोईर (२१ वर्ष) या दोघांमध्ये काल रात्रीच्या सुमारास वाद झाला. या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. चेतनने समीरवर चाकूने वार केले तसेच लोखंडी रॉडने त्याला मारहाण केली. या मारहाणीत समीर गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना डेक्कन जिमखाना भागातील मधू मालती इमारतीच्या एका ब्लॉकमध्ये रात्री सातच्या सुमारास घडली.

याबाबतची माहिती समीरचा भाऊ परेश महेंद्र ठाकरे यांने कर्जत पोलीस ठाण्यात दिली व त्यानुसार रीतसर गुन्हा नोंदविण्यात आला. पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस निरीक्षक के. डी. कोल्हे, पोलीस उप निरीक्षक संदीपन सोनवणे अधिक तपास करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post