शिक्षक,विध्यार्थी,पालक आणि पोलीस प्रशासन यांचे मध्ये निखळ संवाद साधण्यासाठी हा उपक्रम आम्ही राबवत आहोत.... पो. नि.श्री महादेव वाघमोडे


प्रेस मीडिया लाईव्ह :

 इचलकरंजी : शिवाजीनगर पोलीस ठाणे व महिला दक्षता कमिटी यांचे सयूंक्त विध्यमाने पोलीस विभागा मार्फत सुरू असलेल्या " सक्षम शाळा...सदृढ शाळा " या उपक्रमांतर्गत आज सरस्वती हायस्कूल,भोनेमाळ इचलकरंजी येथे किशोरवयीन मुलींच्यासाठी Reel life & Real life या विषयावर अखिल भारतीय जैन कॉन्फरन्स च्या वक्त्या सौ भारती मनोजजी चंगेडिया यांचे व्याख्यान आयोजित केले होते. 

या प्रसंगी मा श्री महादेव वाघमोडे सर. (पोलीस निरीक्षक- शिवाजीनगर पोलीस ठाणे) व जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती वैशालिताई नाईकवडे यांनी मनोगत व्यक्त केले.

  याप्रसंगी श्री वाघमोडे सरांनी सक्षम शाळा व सदृढ शाळा याचे महत्व विशद करताना सांगितले की,शिक्षक,विध्यार्थी,पालक आणि पोलीस प्रशासन यांचे मध्ये निखळ संवाद साधण्यासाठी हा उपक्रम आम्ही राबवत आहोत.त्या करिता आपण सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.

   पोक्सो व सायबर क्राईम सारख्या गुन्ह्यामध्ये कमालीची वाढ होत आहे.त्या करिता अल्पवयीन मुलांनी तर सोशल मीडिया याचा वापर करताना काळजी घेणे आवश्यक आहे.  त्याचबरोबर अल्पवयीन मुलांना कोणापासून त्रास होत असल्यास 112 नंबर डायल करा.पोलीस तात्काळ आपल्या मदतीला धावून येतील.तसेच कोणाची तक्रार असेल तर पोलीसांना संपर्क करावा अथवा अल्पवयीन मुलांना समुपदेशन ची गरज भासल्यास पोलीस सिविल ड्रेस वर येऊन आपले समुपदेशन करतील असे सांगितले.

 जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती वैशालिताई यांनी किशोरवयीन मुलींना शारीरिक व मानसिक बदलाबद्दल समजावून सांगितले.किशोरवयीन मुलींचे भाव विश्व स्वप्नाळू असते.अशा वयात आपल्या हातून एखादे पाऊल चुकीचे पडले तर आपल्या आयुष्याची वाटचाल खडतर होते.त्यामुळे आपल्याला आपले जीवन निर्धोक लाभावे याकरिता सक्षम शाळा व सदृढ शाळा हा उपक्रम आपल्या भावी वाटचालीस कसा उपकारक होऊ शकतो याबद्दल मार्गदर्शन केले.

  प्रमुख वक्त्या सौ. भारती चंगेडिया यांनी आपल्या  प्रबोधनात रिल लाईफने रियल लाइफ कसे आच्छादुन टाकले आहे आणि आपण आपली संपुर्ण दिनचर्या कशी रिल लाईफनुसारच अनुसरतो आहोत हे निदर्शनास आणुन दिले. आणि आपण जे पाहतो,तेच करतो त्यामुळे या ऑडियो विजुअल इम्पॅक्टचा धोका आपण समजुन घेऊन आपल्या सद्विवेक बुद्धीचा वापर करुन सोशल मिडिया आणि इतर स्क्रिनचा वापर करण्याचे आवाहन केले.

   यावेळी सूत्रसंचालन अनुराधा काळे मॅडम यांनी केले,स्वागत व  प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक श्री प्रकाश शिंदे सर यांनी केले तर आभार रेखा जाधव मॅडम यांनी मानले.

  याप्रसंगी महिला दक्षता कमिटीच्या सदस्या श्रीमती निर्मला मोरे,राजश्री बोरगावे,मेघा कांचनकोटी,प्रशालेच्या शिक्षिका संगीता पाटील मॅडम व स्वाती भाटे मॅडम,सामाजिक कार्यकर्ते गजानन शिरगांवे तसेच विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.*

Post a Comment

Previous Post Next Post