सॅलिसबरी पार्कमधील उद्यानाच्या नामांतर प्रकरणावरून भाजपमधील वाद चव्हाट्यावर

 श्रीनाथ भिमाले यांच्यावर कारवाई करा...खासदार गिरीश बापट यांची भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे  मागणी.


प्रेस मीडिया लाईव्ह : 

जिलानी उर्फ मुन्ना शेख

पुणे : सॅलिसबरी पार्कमधील उद्यानाच्या नामांतर प्रकरणावरून भाजपमधील वाद चव्हाट्यावर आला आहे.  स्थानिक रहिवाशांच्या भावनांची दखल न घेतल्याबद्दल माजी नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांच्यावर कारवाई करण्याची मागणी खासदार गिरीश बापट यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे. आता हा वाद पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

सॅलिसबरी पार्कमध्ये महापालिकेने उभारलेल्या उद्यानाला सॅलिसबरी पार्क उद्यान असे नाव द्यावे, असे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे. त्यासाठी सॅलिसबरी पार्क रेसिडेंट असोसिएशन गेल्या दीड महिन्यांपासून आंदोलन करीत आहे. रहिवाशांनी याबाबत माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनाही साकडं घातलं आहे.

या पार्श्वभूमीवर पुणे श्रमिक पत्रकार संघात एका पत्रकार परिषदेनंतर खासदार बापट म्हणाले , ”सॅलिसबरी पार्क मधील रहिवासी गेल्या दीड महिन्यापासून आंदोलन करीत आहेत. महापालिकेच्या विकास कामांना कुटुंबीयांची नावे देण्याची भारतीय जनता पक्षाची संस्कृती नाही, ते योग्य नाही. त्यामुळे रहिवाशांच्या भावनांची दखल घ्यावी असे मी भिमाले यांना सांगितले आहे. परंतु त्यांनी त्याबाबत कार्यवाही न केल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्याकडे केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post