अयोध्या दौऱ्याच्या विरोधाला महाराष्ट्रातून रसद पुरवली गेली.. राज ठाकरे...



जीलानी उर्फ मुन्ना शेख :

प्रेस मीडिया लाईव्ह :

आपल्या अयोध्या दौऱ्यासाठी सापळा रचण्यात आला होता, त्यासाठी महाराष्ट्रातून रसद पुरवली गेली असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील सभेत केला होता. मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी म्हटलं की, "राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यासाठी सापळा शरद पवारांनी लावला. बृजभुषण सिंग हे देशाच्या कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आहेत. तर राज्याचे अध्यक्ष शरद पवार आहेत. या मध्ये भाजपचाही वाटा आहे. मी भाजप मध्ये तीस वर्षे राहिलेलो आहे."

राज ठाकरे म्हणाले की,अयोध्या दौऱ्याच्या विरोधाला महाराष्ट्रातून रसद पुरवली गेली. या दौऱ्याच्या निमित्तानं एक सापळा रचला गेला. दौरा तुर्तास रद्द झाल्यानं अनेकांना वाईट वाटलं. बाबरीच्या वेळी अनेक कारसेवकांना मारण्यात आलं. त्यांची प्रेतं फेकली गेली. मला त्यांचंही दर्शन घ्यायचं होतं. मी हट्टानं जायचं ठरवलं असतं तरी हजारो माझे सैनिक अयोध्येला आले असते. आणि तिथं जर काही झालं असतं तर आपली पोरं अंगावर गेली असती. तुमच्यावर केसेस टाकल्या गेल्या असत्या. हकनाक तुमच्यामागे ससेमिरा टाकला गेला असता. मी आपली पोरं अशी हकनाक घालवणार नाही, असंही राज ठाकरे म्हणाले. ऐन निवडणुकीच्या वेळी या सर्व गोष्टी केल्या असत्या आणि निवडणुकीला इथं कुणीच नसतं. माझी महाराष्ट्रातली ताकद हकनाक तिकडं सापडली असती. माझ्यावर टीका झाली तर होऊ द्या, पोरं मी अडकू देणार नाही, असंही राज ठाकरे म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post