महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षेत डीकेटीईची दिव्या जाजू राज्यात दुसरी वस्ञनगरीच्या यशाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुराप्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी / प्रतिनिधी

महाराष्ट्र शासन मान्य महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षेत डीकेटीई संस्थेच्याअनंतराव भिडे इंग्लिश मेडियम स्कूलची विद्यार्थीनी दिव्या रमेश जाजू हिने २०० पैकी १९६ गुण मिळवूनमहाराष्ट्र राज्यात दुसरा क्रमांक पटकावण्याचा मान मिळवला.तिच्या या यशाने वस्ञनगरीच्या यशाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.

इचलकरंजी येथील डीकेटीई संस्थेच्या अनंतराव भिडे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये दिव्या जाजू ही विद्यार्थीनी इयत्ता तिसरीमध्ये शिकत होती.तिने नुकताच महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षा दिली होती.यामध्ये तिने २०० पैकी १९६ गुण मिळवून महाराष्ट्र राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे.

या यशाबद्दल तिचे संस्थेच्या वतीने अभिनंदन करुन तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.या यशासाठी दिव्या जाजू हिला डीकेटीई संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे , उपाध्यक्ष तथा आमदार प्रकाश आवाडे , मानद सचिव डॉ.सौ.सपना आवाडे ,मुख्याध्यापिका सौ.सुनिता केटकाळे यांच्यासह सर्व शिक्षक - शिक्षिकांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

Previous Post Next Post