बाबूजी नाईक वाड्याचे बांधकाम दर्जेदार करून परिसर सुशोभित करा - उपमुख्यमंत्री अजित पवार


प्रेस मीडिया लाईव्ह :

   बारामती दि. २९  : बारामती शहरातील बाबूजी नाईक वाड्याचे बांधकाम दर्जेदार करून परिसर सुशोभित करावा. बुरुज, नगारखानाचे काम आकर्षीत करावे. वाड्याचे संवर्धन करताना अंतर्गत परिसरात स्वच्छता ठेवावी.  परिसरात अतिक्रमण असल्यास ते काढावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

       


    बारामती परिसरात  सुरु असणाऱ्या विविध विकासकामांची  उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी  आज पाहणी केली. यावेळी महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता सुनिल पावडे, सा. बा. विभागाचे  अधीक्षक अभियंता बप्पा बहिर, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, मुख्याधिकारी महेश रोकडे,  गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल,  पूर्व विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल ढेपे,  तसेच  विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते

           श्री. पवार यांनी यांनी आज बारामती शहरातील बाबूजी नाईक वाडा, एस. टी. स्टँड, आमराई येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर वसाहत व शासकीय विश्रामगृह इत्यादी ठिकाणी सुरू असलेल्या बांधकामाची पाहणी केली. महाहौसिंग मुंबई यांच्याकडून  आमराई येथे २७६ सदनिका व २९ व्यावसायिक गाळे बांधण्याचे काम सुरु आहे. 

श्री. पवार म्हणाले आमराई वसाहतीतील पावणे दोनशे कुटुंबांचे  स्थलांतर करावे म्हणजे बांधकाम करतांना अडचण येणार नाही.  एस. टी. स्टँडच्या इमारतीवर सोलर पॅनल उभारण्यासाठी प्रयत्न करावेत.  विविध ठिकाणी सुरु असलेली विकास कामे चांगल्या दर्जाची आणि वेळेत पूर्ण करावीत, आशा सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. 

                              

Post a Comment

Previous Post Next Post