विद्याचे माहेर घरात विद्यार्थ्यांचा आंदोलन एम फिल ते पीएचडी सलग पाच वर्षाचा फेलोशिप मिळावा या साठी

 विद्यार्थ्यांचा बार्टी कार्यालय पुणे येथे आमरण उपोषण ..

 शासनाने  विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करावा..


प्रेस मीडिया लाईव्ह

अन्वरअली शेख : ( सह संपादक )

पुणे दि.९ विद्याचे माहेरघर पुणे शहरात विद्यार्थ्यांचा फेलोशिप मिळावा म्हणून आंदोलन सुरू केले आहे.एम फिल ते पीएचडी सलग पाच वर्षाचा फेलोशिप मिळावी या मागणीसाठी बार्टी 2018 संशोधक विद्यार्थी बार्टी कार्यालय पुणे येथे आमरण उपोषण करत आहे.

या साठी  मागे सुद्धा विद्यार्थ्यांनी अनेक वेळा आंदोलनं करुन  मुख्यमंत्री, सामाजिक न्याय मंत्री, मुख्य सचिव, प्रधान सचिव, बार्टीचे महासंचालक यांचं ही लक्ष वेधलं परंतु सरकार काहीच पाऊल उचलत नाहीत सरकार तर कान , डोळे बंद करून बसले आहे , त्यांना जाग यावी म्हणून नाईलाजाने विद्यार्थी आमरण उपोषणासाठी रस्त्यावर उतरले आहेत.

  विद्यार्थ्यांना आंदोलनाच्या ठिकाणी एआयएमआयएम

( AIMIM ) पक्षाच्या परखड नेतृत्व गाजवणाऱ्या महिला उपाध्यक्षा सुमय्या पठाण यांनी भेट दिली.व विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मी आणि माझी पक्षश्रेष्ठी तुमच्या बरोबर आहेत आणि सगळे मिळून आवाज उठवू त्या वेळीगुलशन शेख, त्रिशला गायकवाड पुणे शहर जनरल सेक्रेटरी मुबीन खान उपाध्यक्ष पुणे शहर युवा अजीम ओडाकुवाला व सर्व पदाधिकारी यांनी जाऊन विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला आणि दिलासा दिला की बॅरिस्टर असादुद्दीन ओवीसी , खासदार इम्तियाज जलिम , व पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्ते तुमच्या या लढ्याला लढण्यास तुमच्या पाठीशी उभे राहू. संशोधक बार्टी  विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आवाज बुलंद करू त्यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून निर्धार करण्यात आला.


प्रेस मीडिया लाईव्ह

सह-संपादक : अन्वरअली शेख

Post a Comment

Previous Post Next Post